प्लास्टिक मुक्त शाळा करण्यासाठी सुपे येथे रोटरी क्लबकडुन शाळांमध्ये अस्मिता किटचे वाटप.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, July 10, 2022

प्लास्टिक मुक्त शाळा करण्यासाठी सुपे येथे रोटरी क्लबकडुन शाळांमध्ये अस्मिता किटचे वाटप..

प्लास्टिक मुक्त शाळा करण्यासाठी सुपे येथे रोटरी क्लबकडुन शाळांमध्ये अस्मिता किटचे वाटप..
सुपा:-बारामती तालुक्यातील सुपे येथील रोटरी क्लब ऑफ सुपे परगण्याच्यावतीने येथील श्री शहाजी विद्यालयात ई - लर्निंग संच आणि सुमारे २०० मुलींना अस्मिता किटचे वाटप करण्यात आले.येथील विद्यालयाच्या आवारात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अस्मिता किटमध्ये मुलींना प्रत्येकी १६ पॅड, रक्तवाढीच्या गोळ्या, अस्मिताचे पुस्तक आणि दोन टॅब देण्यात आले. यावेळी ई - लर्निंग संच शाळेला देण्यात आला.दरम्यान येथील शाळेसह सुप्यातील प्राथमिक शाळा क्रमांक १ आणि २ तसेच दंडवाडी व खोपवाडी येथील शाळांना ई - लर्निंग संच देण्यात आल्याची माहिती येथील रोटरी क्लबचे अध्यक्ष सुभाष चांदगुडे यांनी दिली. तर भविष्यात येथील
विद्यालयातील मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी स्टीलची बाटली तसेच जेवणाचे स्टील डबे देवुन प्लॅस्टिकमुक्त शाळा करण्याचा निर्धार असल्याचे चांदगुडे यांनी सांगितले.याप्रसंगी बारामती रोटरी क्लबचे निखिल मुथा, भिगवणचे संजय खाडे, विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती व्ही. बी. जाधव,
पर्यवेक्षक एस. ए. लोणकर, सुप्यातील रोटरी क्लबचे सचिव पोपट चिपाडे, सदस्य राजेंद्र धुमाळ, शहाजी चांदगुडे, हनुमंत चांदगुडे, अच्युत नगरे, प्रविण सुपेकरअशोक बसाळे, अशोक लोणकर, भगवान खैरे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक संजय खाडे यांनी केले.
सुत्रसंचालन अशोक लोणकर यांनी केले. तर आभार गायकवाड यांनी मानले.

No comments:

Post a Comment