जातनिहाय जनगणनासाठी रासपचा दिल्लीत मोर्चा* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, July 25, 2022

जातनिहाय जनगणनासाठी रासपचा दिल्लीत मोर्चा*

*जातनिहाय जनगणनासाठी रासपचा दिल्लीत मोर्चा*
बारामती:-  ओबीसींची जातनिहाय जनगणना 2022 च्या सेन्सस करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने दि. 05 ऑगस्ट शुक्रवार रोजी नवी दिल्लीत भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. 
             महाराष्ट्रात बांठीया आयोगाने ओबीसींची लोकसंख्या 37-40 % दाखवल्यामुळे राजकीय पक्षातील ओबीसी नेत्यामधेच संभ्रमाची स्थिती आहे.  जनगणना  केल्यामुळे  केंद्रीय अर्थसंकल्पात ओबीसींची भागीदारी देऊन सामाजिक व रोजगार स्थिती सुधारण्याचा मार्ग मोकळा होईल. या मागणीसाठी दि. 05 ऑगस्ट रोजी जंतर मंतर दिल्ली येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे जिल्हा संघटक चंद्रकांत वाघमोडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे सांगितले आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व मा.मंत्री आमदार मा.महादेवराव जानकर  यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशभरातील ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने आपल्या न्याय हक्कासाठी या मोर्चात सामील होणार आहेत.
पुणे जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येने राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते तसेच ओबीसी समाज बांधव या मोर्चाला उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले....

No comments:

Post a Comment