श्री काशी विश्वनाथ मंदिराचा प्रसाद टपाल विभागामार्फत स्पीड पोस्टने आता घरपोच मिळणार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, July 18, 2022

श्री काशी विश्वनाथ मंदिराचा प्रसाद टपाल विभागामार्फत स्पीड पोस्टने आता घरपोच मिळणार..

श्री काशी विश्वनाथ मंदिराचा प्रसाद टपाल विभागामार्फत स्पीड पोस्टने आता घरपोच मिळणार..
पुणे:- श्री काशी विश्वनाथ मंदिराचा प्रसाद टपाल विभागामार्फत स्पीड पोस्ट द्वारे घरपोच पाठवण्याची सुविधा सुरु करण्यात आली आहे. प्रसाद मिळवण्यासाठी आपल्या जवळच्या
पोस्टातून रु 251/- (दोनशे एक्कावन्न फक्त) ची मनीऑर्डर प्रवर अधीक्षक वाराणसी पूर्व मंडल वाराणसी-221001 या पत्त्यावर करावी तसेच स्वतःचा पत्ता, पिन कोड व मोबाईल क्रमांक अचूक लिहावा. प्रसाद सामग्रीमध्ये काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगाचा फोटो, महामृतुन्जय यंत्र, श्री शिव चालीसा, १०८ मण्यांची रुद्राक्ष माळ , बेल पत्र, माता अन्नपूर्णाच्या चित्राचे नाणे,
भभूती, रक्षा सूत्र,रुद्राक्ष, मेवा व मिश्री चे पॅकेट इ मिळेल.टपाल खात्याच्या या विशेष सुविधेचा लाभ सर्व शिवभक्तांनी घेण्याचे आवाहन पुणे ग्रामीण विभागाचे अधीक्षक श्री बी पी एरंडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment