रुबी हॉल हॉस्पिटल मध्ये डांबून ठेवलेल्या 75 वर्षीय आजीची सुटका करावी म्हणून रुग्ण हक्क परिषदेचे आंदोलन!
पुणे: - हृदविकाराने त्रस्त असणाऱ्या पुरंदर तालुक्यातील एका 75 वर्षीय आजीला रुबी हॉल हॉस्पिटल मध्ये उपचार पूर्ण झाल्या नंतरही गेले पाच दिवस डांबून ठेवले आहे.
सदर आजी हृदयविकाराची रुग्ण आहे. त्यांना घरी जाण्याची ओढ निर्माण झाली आहे. नातवांडे आणि मुलामध्ये जायचे आहे. तरी केवळ हॉस्पिटल मध्ये भरायला पैसे नाहीत, म्हणून आजींची सुटका केली जात नाही.
पैशा अभावी रुग्णाला अडवून ठेवणे, मानवी मूल्यांचे - मानवी हक्काचे उल्लंघन करणारे आहे. मानवी मनाचा आणि शरीराचा आवमान करणारे आहे.
भर पावसात रुग्णाचे नातेवाईक आणि रुग्ण हक्क परिषदेचे कार्यकर्ते आजींची सुटका व्हावी म्हणून रुबी हॉल हॉस्पिटल समोर उपोषण करत बसले आहेत, तरी सुद्धा गेंड्याच्या कातडी प्रमाणे असणारे शासन, धर्मादाय कार्यालय, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, पुणे मनपाचा आरोग्य विभाग रुग्ण आणि रुग्णच्या नातेवाईक मंडळीचा अंत बघत आहेत.
सदर आंदोलनाचे नेतृत्व पुणे शहर अध्यक्ष अपर्णा साठ्ये आणि उपाध्यक्ष विजय लांडे करत आहेत. शिवाजी रणदिवे, चित्रा साळवे, प्रभा आवलेलू, अजित कुंजीर, संजय कुरकुटे आणि रुग्णाचे नातेवाईक उपोषण करत आहेत. परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनीही सदर आंदोलनाला भेट दिली. रुग्णाचे बिल माफ करून तात्काळ आजी बाईंना घरी सोडावे असे उपोषण कर्ते म्हणत आहेत. शासनाच्या आरोग्य योजना बोगस आहेत का? असा सवाल यनिमित्ताने विचारला जात आहे.
No comments:
Post a Comment