स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बारामती शहर पोलीस ठाणे तर्फे विविध उपक्रम.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, August 12, 2022

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बारामती शहर पोलीस ठाणे तर्फे विविध उपक्रम..

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बारामती शहर पोलीस ठाणे तर्फे विविध उपक्रम..

बारामती:- सध्या आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत या कालावधीमध्ये पोलीस दलाची ओळख सर्वसामान्य नागरिकांना मुलांना व्हावी म्हणून पोलीस दलात असणाऱ्या रँक याबाबतची माहिती देण्यात आली 
तसेच पोलिसांना देण्यात येणारी हत्यारे दारुगोळा याबाबतची माहिती , वाहतूक नियमाचे जे चिन्ह व त्याचा अर्थ याबाबत नागरिकांना व मुलांना उदबोधन करण्यात आले. 
हर घर तिरंगा या योजनेखाली पोलिसांतर्फे शहरांमध्ये तिरंगा रॅलीमध्ये सहभाग घेण्यात आला. तसेच आता जे पारंपारिक गुन्हे होते त्यापेक्षा कितीतरी पटीने सायबर गुन्हेगारी मध्ये वाढ झालेली आहे आणि या गुन्हेगारीपासून सावधानता कशी वाळावी व आपली माहिती कशी सुरक्षित ठेवावी व भविष्यातील मनस्ताप कसा टाळावा व त्यामधून किती गुंतागुंतीचे प्रकार निष्पन्न होतात यासाठी महाविद्यालयातील मुलांना पावर पॉइंट प्रेझेंटेशन च्या आधारे सायबर गुन्हेगारी बाबत माहिती देण्यात आली. 
अशा रीतीने आज विविध ठिकाणी पोलिसांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम घेतले. तसेच सायंकाळी साडेपाच वाजता भिगवन चौक या ठिकाणी. नागरिकांना तिरंगा वाटप करण्यात येणार आहे. उपक्रमामध्ये बारामती शहर पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी दैनंदिन कामकाज करून उत्साहाने सहभाग नोंदवला. हे सर्व कार्यक्रम प्रत्येक नागरिक हा साध्या कपड्यातील पोलीस व प्रत्येक पोलीस वर्दीतील माणूस या घोषवाक्यावर आधारित धरून राबवण्यात आले.

No comments:

Post a Comment