तरुणीवर लैंगिक अत्याचार करत लग्नाविषयी विचारल्यास व्हिडिओ वायरल करण्याची दिली धमकी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 30, 2022

तरुणीवर लैंगिक अत्याचार करत लग्नाविषयी विचारल्यास व्हिडिओ वायरल करण्याची दिली धमकी..

तरुणीवर लैंगिक अत्याचार करत लग्नाविषयी विचारल्यास व्हिडिओ वायरल करण्याची दिली धमकी..
पुणे :- महिला अत्याचाराच्या प्रमाणात वाढ होत असून यावर कडक कायदे कधी होणार हे येणार काळ ठरवेल पण नुकताच फेसबुकवर ओळख झाल्यानंतर वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार  केला. त्यानंतर लग्नाबाबत विचारल्यावर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या तरुणावर कोंढवा पोलिसांनी गुन्हा  दाखल केला आहे. अरफाज आरिफ शेख (वय २८,रा. साईनगर, चंदननगर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. हा प्रकार कोरेगाव पार्क, महंमदवाडी चंदननगर तसेच विविध लॉजवर २०१७ ते २१ ऑगस्ट २०२२ दरम्यान घडला.याबाबत कॅम्पमधील एका २७ वर्षाच्या तरुणीने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद (गु. रजि. नं. ८८३/२२) दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी अरफाज यांची फेसबुकवर ओळख झाली होती.त्यानंतर अरफाज याने फिर्यादीशी जवळीक साधून तिला लग्नाचे आमिष दाखविले.तिला वेगवेगळ्या लॉजवर नेऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संभोग केला.त्यावेळी त्याने स्वत:चे मोबाईलमध्ये त्याचे व्हिडिओ शुटिंग केले.फिर्यादी यांनी त्याला लग्नाविषयी विचारल्यावर त्याने काय करायचे ते कर, असे बोलून जास्त मागे लागली तर तुझे व्हिडिओ कोठे पाठवितो ते बघ असे बोलून धमकी दिली.त्यामुळे आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यावर या तरुणीने पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली आहे.सहायक पोलीस निरीक्षक दगडे तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment