बापरे.. बदली करण्यासाठी 1 लाख रुपये लाच घेणारा अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात अडकला पोलीस निरीक्षक वारे.! पालघर :- लाच घेणाऱ्याचे तक्रारदार दखल घेत नाहीआणि त्यांच्या सहकाऱ्याची बदली करण्यासाठी दोघांचे मिळून 1 लाख रुपये लाच घेताना महामार्ग सुरक्षा पथक, पनवेल
विभागाचे पोलीस निरीक्षक रामचंद्र नारायण वारे
यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे. ठाणे एसीबीच्या पथकान ही कारवाई मंगळवारी (दि.20) सायंकाळी 6.36 वाजता पोलीस निरीक्षक वारे यांच्या केबिनमध्ये केली.याबाबत 41 वर्षीय व्यक्तीने ठाणे लाचलुचपत
प्रतिबंधक विभागाकडे पोलीस निरीक्षक रामचंद्र वारे यांनी लाच मागितल्याची तक्रार केली होती. तक्रारदार आणि त्यांच्या सहकाऱ्याची बदली करण्यासाठी पोलीस निरीक्षक
रामंचंद्र वारे यांनी प्रत्येकी 50 हजार प्रमाणे 1 लाख रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी ठाणे एसीबीकडे तक्रार केली.लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी
(दि.19) पंचासमक्ष पडताळणी केली असता,
पोलीस निरीक्षक वारे यांनी बदली करण्यासाठी एक लाख रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले.
मंगळवारी सायंकाळी ठाणे एसीबीच्या पथकाने सापळा रचलातक्रारदार यांच्याकडून एक लाख रुपये लाच घेतावारे यांना रंगेहात पकडण्यात आले. वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याला लाच घेताना अटक करण्यात आल्याने पालघर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले ,अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पालघर पोलिस उपअधीक्षक नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वपन
बिश्वास पोलीस हवालदार संजय सुतार, अमित चव्हाण, विलास भोये, निशा मांजरेकर, नवनाथ भगत,पोलीस नाईक दिपक सुमडा, सखाराम दोडे यांच्या पथकाने केली.
No comments:
Post a Comment