सहायक पोलीस निरीक्षक असल्याची बतावणी करत रूमवर पोरी-पोरांना आणून धंदा करतो? म्हणत कॉलेज विद्यार्थ्याची फसवणूक..
पुणे : - पोलीस असल्याचे सांगून अनेकांना गंडा घालण्याचे प्रकार समोर असताना आणखी एक उदाहरण पुढे आले याबाबत माहिती अशी की ,सहायक पोलीस निरीक्षक असल्याची बतावणी करुन कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची
आर्थिक फसवणूक केल्याचा नुकताच प्रकार घडला होता. या गुन्ह्यातील आरोपीला गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास
धनकवडी शेवटचा बस स्टॉप येथे करण्यात आली.
शुभम अशोक माने (वय-22 रा. भवानी पार्क बिल्डींग, मंदार सोसायटी,
धनकवडी सध्या रा. मांगडेवाडी, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी शुभम माने याच्यावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात आयपीसी 420, 170, 504 नुसार गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. या गुन्ह्याचा तपास सिहंगड पोलीस आणि
युनिट तीनच्या पथकाकडून करण्यात येत होता.आरोपीने कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला आपण सहायक पोलीस निरीक्षक असल्याचे सांगितले. रूमवर
पोरी-पोरांना आणतो, धंदा करतो? अशी विद्यार्थ्याला
धमकी देऊन त्याच्याकडून पैसे घेऊन आर्थिक फसवणूक केली. गुन्ह्याचा तपास करत
असताना युनिट तीनच्या पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही तपासले.त्यावेळी आरोपीने गुन्ह्यात वापरलेल्या ज्युपिटर
गाडी नंबर एम एच12एन एस1871 क्रमांक पोलिसांना मिळाला,पोलिसांनी गाडीच्या नंबरवरुन गाडी मालकाच्या घराचा पत्ता शोधला. आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलीस
जात असताना आरोपी गुन्ह्यात वापरलेल्या
दुचाकीवरुन जात असल्याचे आढळून आले. धनकवडी
शेवटच्या बस स्टॉपजवळ पोलिसांनी त्यांची गाडी
आडवी घालून आरोपीला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष क्षीरसागर ,पोलीस अंमलदार रामदास गोणते, शरद वाकसे, सुजित
पवार, संजीव कळंबे, सोनम नेवसे, ज्ञानेश्वर चित्ते,
प्रताप पडवाळ, सतिश कत्राळे, राकेश टेकावडे
साईनाथ पाटील, गणेश शिंदे यांच्या पथकाने केली.
No comments:
Post a Comment