बारामतीच्या लॉजवर चालत होता वेश्या व्यवसाय,पोलिसांनी पकडले रंगेहाथ..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, September 12, 2022

बारामतीच्या लॉजवर चालत होता वेश्या व्यवसाय,पोलिसांनी पकडले रंगेहाथ..!

बारामतीच्या लॉजवर चालत होता वेश्या व्यवसाय,पोलिसांनी पकडले रंगेहाथ..!
                                                                बारामती:-बारामती व बारामतीच्या आसपासच्या काही लॉजवर वैश्या व्यवसाय चालत असल्याचे चर्चा ऐकावयास येत होते,तर काही ठिकाणी अपार्टमेंट व बंगल्यात असे व्यवसाय काही एजंटला हाताशी धरून एमआयडीसी परिसरात चालू असल्याचे कळतंय,पण कारवाई होत नव्हती कारण त्याला ठोस पुरावा सापडत नव्हता की काय असे कळतंय.तर अनेक महिला अत्याचाऱ्याच्या घटना घडल्या त्या घटना देखील लॉजवर घडल्या असल्याचा अनेक तक्रारीत म्हंटले आहे,नुकताच बारामतीतील एमआयडीसीतील RTO कार्यालयाजवळील हॉटेल राजलक्ष्मी येथील लॉजिंगवर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत येथे वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या दोन परप्रांतीय महिलांची सुटका करण्यात आली आहे.यासंदर्भात तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. किरण बापू पाटील, युवराज लोखंडे व विठ्ठल चव्हाण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार गणेश शिवदास काटकर यांनी फिर्याद दिली.
उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्यासह त्यांच्या पथकाने या कारवाईत भाग घेतला.10 सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. येथील राजलक्ष्मी हॉटेल, परमीट रुम, बार व लॉजिंगमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती इंगळे यांना मिळाली होती. त्यानुसार पंच व बनावट ग्राहकांना सोबत घेत पथक या भागात पोहोचले. बनावट ग्राहकाकडे काही नोटा देत त्याचे क्रमांक नमुद करून घेण्यात आले.
त्याने लॉजिंगवर जात वेश्यागमनासाठी महिलेची
मागणी केली. १२०० रुपये दर त्याला सांगण्यात
आला. त्यानुसार त्याने पैसे देत पथकाला इशारा केला.एका खोलीतून दोन महिलांची सुटका केली. त्यातील एक महिला ओडिसा तर दुसरी आसाम राज्यातील आहे. या ठिकाणाहून पोलिसांनी रोख रकमेसह मोबाईल जप्त केले. पाटील यांच्याकडील चौकशीत युवराज लोखंडे व विठ्ठल चव्हाण यांच्या सांगण्यावरून हा व्यवसाय येथे केला जात असल्याची माहिती त्याने दिली. पोलिसांनी या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला
असून पाटील याला अटक करण्यात आली.तर आपल्या आसपासच्या परिसरात असे काही संशयास्पद दिसल्यास नागरीकांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment