पशुपालक, शेतकरी व व्यापारी बंधुसाठी जाहीर आवाहन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, September 12, 2022

पशुपालक, शेतकरी व व्यापारी बंधुसाठी जाहीर आवाहन..

पशुपालक, शेतकरी व व्यापारी बंधुसाठी जाहीर आवाहन..
बारामती:- शासन निर्णय दि. २/६/२०२२ व मा. जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे दि. ९/९/२०२२ रोजीचे परिपत्रक यानुसार प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ च्या अनुषंगाने लंपी स्किन डिसीज बाधित क्षेत्र व निगराणी क्षेत्र घोषित केलेले आहे. त्यामुळे गोजातीय प्रजातीची सर्व गुरे व म्हशी यांची एका ठिकाणावरून दुस-या ठिकाणी व नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस तसेच गोजातीय प्रजातीच्या गुरे व म्हशीचा कोणताही प्राणी बाजार भरवणे, प्राण्याच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरविणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रित क्षेत्रात गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे गट करून किंवा त्यांना एकत्रित करून कोणताही कार्यक्रम पार पाडणे यास मनाई करण्यात आलेली आहे.लम्पी चर्मरोग हा प्राण्यांमध्ये जलदगतीने पसरणारा अनुसूचित रोग आहे. त्यामुळे सदर रोगाचा प्रसार होण्यास प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेच्या सुचना दिल्या आहेत. सदर आदेशान्वये
बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे जळोची उपबाजार येथील दर गुरूवारी भरणारा जनावरे बाजार गुरूवार दि. १५/०९/२०२२ पासुन पुढील आदेश येई पर्यन्त बंद करण्यात येत आहे. याची
कृपया नोंद घ्यावी. सर्व पशुपालक व शेतक-यांनी आपल्या जनावरांची काळजी घ्यावी. आपले गुरे व म्हशी, शेळीमेंढी विक्रीस आणु नये असे आव्हान बाजार समितीचे प्रशासक मिलिंद टांकसाळे व सचिव अरविंद जगताप यांनी केले आहे. तरी बाजार समितीस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले.

No comments:

Post a Comment