बारामतीत रेशनिंगचा काळाबाजार..मार्केटमधील काही व्यापारी घेतात गव्हू, तांदूळ.! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, September 18, 2022

बारामतीत रेशनिंगचा काळाबाजार..मार्केटमधील काही व्यापारी घेतात गव्हू, तांदूळ.!

बारामतीत रेशनिंगचा  काळाबाजार..मार्केटमधील काही व्यापारी घेतात गव्हू, तांदूळ.!                                                         बारामती:-गेल्या अनेक वर्षांपासून बारामतीत रेशनिंगचा काळाबाजार होत आहे, तर अनेक वेळा कारवाई देखील झाली होती परंतु पुन्हा कोणत्यानाकोणत्या मार्गाने पुन्हा हा रेशनिंगचा काळाबाजार होत आहे, मार्केट यार्ड मध्ये काही व्यापारी हा माल घेतात व ज्यादा दराने पॉलिश करून विकतात, शेतकऱ्याचा नावाखाली हा माल(गव्हू, तांदूळ)शासकीय पोती बदलून साध्या पोत्यात भरून सकाळी किंवा रात्रीच्या वेळेस व लिलाव चालू असताना मार्केट मध्ये आणला जातो तर काही लोक स्वतः टू व्हीलर वर पोत्यात गव्हू व तांदूळ घेऊन विकायला आणतात,असे अनेक लोक स्वतः येतात तर काहीजण छोटया टेम्पोत,रिक्षात रेशनिंगचे धान्य आणून विकले जाते मात्र यावर कोणतीही कारवाई होत नाही, सरकार गोरगरिबांना हे धान्य मोफत व स्वस्त देत असताना त्याचा दुरुपयोग होत आहे व स्वस्त धान्य दुकानदार देखील रेशनिंगचे गव्हू व तांदुळ मार्केट मध्ये विकण्यास आणत आहे अश्यावेळी तक्रारी केल्या तर शेतकऱ्याचा माल आहे असे म्हणून सांगितले जाते याकडे कधी लक्ष देणार,गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेला काळाबाजार याची सखोल चौकशी होणार का?त्या व्यापाऱ्यांची चौकशी होऊन त्यांचे साटेलोटे असणारे स्वस्त दुकानदार व काही ठेका घेतलेली मंडळी यांचा पर्दाफाश होणार का?हे  पहावे लागेल अशी प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

No comments:

Post a Comment