बारामतीत स्वस्त धान्याचा काळाबाजार जोमात,मार्केट यार्डच्या गोदामात..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, September 8, 2022

बारामतीत स्वस्त धान्याचा काळाबाजार जोमात,मार्केट यार्डच्या गोदामात..!

बारामतीत स्वस्त धान्याचा काळाबाजार जोमात,मार्केट यार्डच्या गोदामात..!
बारामती:- बारामतीत मार्केट यार्डात स्वस्त धान्य राजरोज पणे येत आहे शासकीय पोती बदलून पोतीमध्ये गहू व तांदूळ येत आहे मार्केट यार्डच्या आवारातील cctv फुटेज तपासल्यास लक्षात येईल,तर या मार्केट मधील ठराविक व्यापाऱ्यांचे गोदामात हा माल साठविला जातो व तेथून तो पुणे, सातारा व इतर ठिकाणी कंपनीला पाठविला जातो,तर काही मालाला पॉलिश करून ज्यादा दराने विकला जातो, पण यावर कारवाई होत नाही नव्हे ती केली जात नाही. शासकीय स्वस्त धान्य दुकानामार्फत अंतोदय, बीपीएल व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना तांदूळ व गव्हाचे वितरण स्वस्त दरात करण्यात येते. मात्र स्वस्त दुकानातून घेतलेले धान्य रेशन कार्डधारक चक्क व्यापाऱ्याला विकून मोकळे होत असल्याचे दिसून येत आहे. यात नेमका दोष कोणाचा? हा संशोधनाचा विषय ठरत असला तरी स्वस्त धान्य दुकानाचा काळाबाजार जोमात सुरु असून संबंधित विभाग अनभिज्ञ असल्याचे दिसत आहे.कोरोना काळापासून शासनाकडून गरीब कल्याण योजनेतंर्गत रेशन कार्डवरील प्रति युनिट 5 किलोप्रमाणे मोफत धान्य दिले गेले. ती योजना सुरु असल्याने गावागावांमध्ये मिळणारे धान्य व्यापाऱ्याला विकण्याचा गोरखधंदा सुरु आहे. बारामती शहरात व प्रत्येक गावात किरकोळ खरेदी करणारे व्यापारी तांदूळ व गव्हाची
खरेदी करताना दिसून येत आहेत. तसेच शहर व  ग्रामीण भागातील व्यापारी लाभार्थ्यांकडून खरेदी केलेले रेशनचे धान्य शहरातील मोठ्या व्यापाऱ्यांना विक्री करीत असल्याने या गोरखधंद्यात लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत
आहे. यासाठी अन्न पुरवठा विभागाने जातीने लक्ष
देऊन कारवाई करणे अपेक्षित होते मात्र अद्याप
कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. हा प्रकार
शासनाच्या डोळ्यात एकप्रकारे धूळफेक करणारा
असल्याने अन्नपुरवठा विभाग याकडे लक्ष देईल काय?असा प्रश्न सर्वसामान्य जनता करीत आहे.गावांमध्ये मोजकेच गरीब कुटूंबांना
रेशनच्या धान्याचा वापर करतात. अनेक लाभार्थ्यांकडे शेती असून त्यांना घरचे धान्य होते. त्यामुळे लाभार्थी धान्य विकून टाकतात. शासनाकडून मिळणाऱ्या गहू-तांदळाला 12 ते 18 रुपये भाव मिळत असल्याने फुकट आणायचे अन् विकून टाकायचे, असा गोरखधंदा अनेकजण करीत आहे.शेतकऱ्याचा गव्हू आहे असे छातीठोकपणे सांगतात पण जनता मूर्ख नाही, तर तांदूळ हे काय बारामतीत पिकतं का?त्याचा काळाबाजार होतोय गोदाम भरली आहे त्याचे काय प्रश्न पडतो?याबाबत लवकरच पर्दाफाश होईल पण कारवाई होतेय का हे पाहणे गरजेचं आहे, गावागावात हा प्रकार जोमात सुरु आहे. तर मोठे व्यापारी हेच धान्य खरेदी करुन व त्यावर पॉलिश करुन दुप्पट भावाने विक्री करीत असल्याची चर्चा आहे.

No comments:

Post a Comment