बापरे..महिलेकडून न्यूड व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकीने तरूण युवकाची आत्महत्या.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, October 10, 2022

बापरे..महिलेकडून न्यूड व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकीने तरूण युवकाची आत्महत्या..

बापरे..महिलेकडून न्यूड व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकीने तरूण युवकाची आत्महत्या..
 पुणे :-आत्तापर्यंत पुरुषाने महिलेचा व्हिडीओ काढून धमकी दिल्याचे पाहिले व ऐकले आहे पण चक्क महिलेनेच न्यूड व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.. पुढे काय झालं याबाबत मिळालेली माहिती अशी की,अनोळखी महिलेचा डीपी असलेल्या व्हॉटसअपवरुन चॅटींग करुन त्याचा न्युड व्हिडिओ बनवून तो अपलोड
करण्याची भिती दाखवून तरुणाला ब्लॅकमेल केले जात होते. या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या  केल्याचा प्रकार समोर आला आहे. अमोल राजू गायकवाड (वय २२, रा. तानाजीनगर, धनकवडी) असे आत्महत्या
केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या भावाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. २१७/२२) दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल
गायकवाड हा आयटीआय झाला होता. त्याला एका अनोळखी महिलेचा डीपी असलेला व्हॉटसअॅप आला.त्याने त्याला प्रतिउत्तर दिल्यानंतर त्यांच्यात चॅटींग सुरु झाले. चॅटींग करुन त्याचा न्युड व्हिडिओ बनविला गेला. तो अपलोड करण्याची भिती दाखवून त्याच्याकडे पैशांची मागणी केली गेली. वेळोवेळी त्यांच्याकडून ४ हजार ५०० रुपये फोन पे वरुन घेतले. या मानसिक त्रासाला कंटाळून अमोल याने "मै सुसाईड कर रहा हु "असा मेसेज नमूद करुन तो मोबाईल धारकास पाठविला. तेव्हा त्याने "करो मै व्हिडिओ ऑनलाइन करता हुं” असे म्हणून सतत पैशांची मागणी केली.
त्यामुळे ३० सप्टेंबर रोजी दुपारी अमोल याने
आत्महत्या केली.याबाबत सहकारनगर पोलिसांनी आकस्मात मृत्यु अशी नोंद करुन तपासाला सुरुवात केली.त्यात अमोल याचा मोबाईल तपासला असता, व्हिडिओ, त्याचे झालेले चॅटिंग व त्याने फोन पे द्वारे पाठविलेले पैसे हा सर्व तपशील समोर आल्यावर त्याच्या आत्महत्येचे कारण समोर आले.पोलीस निरीक्षक प्रकाश पासलकर अधिक तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment