*हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे? या पुस्तकाची चारच दिवसात पहिली आवृत्ती संपली...* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, October 9, 2022

*हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे? या पुस्तकाची चारच दिवसात पहिली आवृत्ती संपली...*

*हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे? या पुस्तकाची चारच दिवसात पहिली आवृत्ती संपली...*

पुणे :- रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी लिहिलेले हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे? या पुस्तकाचे मंगळवार दिनांक 4 ऑक्टोबर 2022 रोजी मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. प्रकाशन होऊन चारच दिवस झाले आणि पहिली आवृत्ती हातोहात संपली.
        मोफत उपचार मिळविण्याच्या योजना कोणत्या आहेत? कोणत्या हॉस्पिटलमध्ये या योजनांवर उपचार केले जातात? यासाठीची नियमावली काय आहे? यासंबंधीची विस्तृत माहिती हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे या पुस्तकामध्ये दिलेली आहे. 312 पानांचे हे पुस्तक असून, या पुस्तकाला प्रसिद्ध वैद्यकीय तज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अमोल देवळेकर यांची प्रस्तावना लाभली आहे.
      हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे? या पुस्तकाला संपूर्ण राज्यातून मागणी आहे. पुस्तकाच्या उपलब्धतेसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधा. 8805020059 आणि 9145215092 राज्यात सर्वत्र पुस्तक उपलब्ध होईल, असे प्रकाशन संस्थेच्या वतीने यावेळी सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment