अखेर माळेगावात मटका चालविण्याऱ्यावर कारवाई.. दारू विक्री करणाऱ्यावर कधी?तर पणदरे हद्दीत मटका व दारूवर कारवाई कधी? - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, October 8, 2022

अखेर माळेगावात मटका चालविण्याऱ्यावर कारवाई.. दारू विक्री करणाऱ्यावर कधी?तर पणदरे हद्दीत मटका व दारूवर कारवाई कधी?

अखेर माळेगावात मटका चालविण्याऱ्यावर कारवाई.. दारू विक्री करणाऱ्यावर कधी?तर पणदरे हद्दीत मटका व दारूवर कारवाई कधी ?                                                           बारामती:- बारामती तालुकयातील
माळेगावसह परिसरामध्ये लपून छपून सुरू
असलेल्या मटका व्यवसायावर माळेगाव
पोलिसांकडून 4 ऑक्टोबर 2022 रोजी रात्रीच्या
वेळी धाड टाकण्यात आली.यावेळी पोलिसांनी मंगळवारी रात्री 8.30 च्या सुमारास टाकलेल्या धाडीमध्ये मटका घेताना दिलीप शितोळे, संतोष निंबाळकर, विश्वास ताकवले, मोहन खंडागळे, रज्जाक शेख व अक्षय शितोळे हे मटका घेताना आणि खेळताना आढळून आले. यावेळी अंधाराचा फायदा घेत अक्षय शितोळे हा पळून गेला. या कारवाईत पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईलमधील व्हॉट्सअॅपवर शितोळे
यांनी मटक्याचे आकडे घेतलेले दिसत होते. सदर
कारवाईत रोख रक्कम 29, 210 रुपये जप्त केली.तसेच संबंधितांना अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली. या
कारवाईमध्ये माळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस
उपनिरीक्षक देविदास साळवे, पोलीस उपनिरीक्षक तुषार भोर, सादिक सय्यद व नंदकुमार गव्हाणे यांनी सहभाग घेतला.याबद्दल माळेगाव मधील नागरिकांनी समाधान व्यक्त असले तरी अवैध दारू विक्री करणार्यांवर कधी कारवाई होणार तर पणदरे हद्दीत देखील मटका व दारू चोरून चालू असून त्यावर कारवाई होईल का अशी प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत असले तरी नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक नक्कीच कारवाई करतील अशी आशा होताना दिसते.

No comments:

Post a Comment