बाबारे.. बारामतीचा होतोय विकास,पण कालांतराने होतोय भकास.! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, October 12, 2022

बाबारे.. बारामतीचा होतोय विकास,पण कालांतराने होतोय भकास.!

बाबारे.. बारामतीचा होतोय विकास,पण कालांतराने होतोय भकास.!                                  बारामती:-बारामती राज्यात नव्हे तर देशात चर्चेत आहे,कारण या बारामतीत आदरणीय शरद पवारसाहेब, खासदार सुप्रियाताई सुळे,मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सर्वजण बारामतीतले  त्यातच बारामतीचा विकास झपाट्याने होत आहे अजितदादांमुळे कारण ते कोटयावधीचा निधी आणून बारामतीतील रस्ते,शासकीय कार्यालये, कॅनॉल सिमेंट काँक्रीटीकरण तसेच अनेक प्रकल्प व कामे चालू आहे त्याबद्दल कौतुक करावे तेवढे कमीच आहे आणि अभिमान ही आहे पण ह्या कामातील दर्जा तपासला जातो का? हे समजू शकले नाही..हो खरंच समजू शकले नाही, पहा काही महिन्यांपूर्वी बारामतीतील रस्ते बनविले ते मग सार्वजनिक बांधकाम उपविभाग असो की बारामती नगरपरिषदे मार्फत झालेली कामे असो एक दोन पावसात रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था झालीय याला जबाबदार कोण?ठेकेदार की शाखा अभियंता की वरिष्ठ अधिकारी की त्या कामासाठी निधी आणणारे नेते की ज्यांनी मतदानातून भरघोस मते देणारे मतदार की मूलभूत सुविधा मिळावी म्हणून कर भरणारे नागरिक कोणाला जबाबदार धरायचे की रस्त्यातल्या खड्ड्यात पडून जखमी झालेले वाहनचालक? सांगा कोणाला धरायचे जबाबदार अशी विचारणा होताना दिसत आहे, नेते कोटयावधी रुपयांचा निधी आणून विकासकामे करण्याच्या तयारीत आहेत मात्र ठेकेदार व अधिकारी यांच्या आर्थिक हितसंबंधापायी निकृष्ठ दर्जाचे कामे होत आहे हे त्या झालेल्या कामावरून दिसत आहे,तर अशी काही कामे झालेली आहे की त्या बांधकामाला तडे गेलेत, उदाहरण म्हणजे प्रशासकीय भवन या भव्य अश्या कोटयावधी रुपये खर्च करून  बांधलेल्या इमारतीत स्लॅब मधून पाणी गळत होते तर फरश्या उचकटलेल्या होत्या अश्या अनेक कामात निकृष्ठ दर्जा दिसून आलेला पाहिला आहे अशी अनेक उदाहरणे देता येईल,तर नुकताच झालेली रस्ते देखील निकृष्ठ दर्जाची झालेली आहे त्यामुळे बारामतीकर खड्ड्यातुन जात असताना ज्या यातना भोगतात ते समक्ष त्यांच्या तोंडून ऐकल्यावर कळेल पण तोपर्यंत तरी निदान पुढील कामाचा दर्जा तरी सुधारावा हीच अपेक्षा..*** किमान दीपावली सण आला आहे तेव्हा तात्पुरते तरी हे खड्डे बुजवावे ही अशी मागणी होत आहे अन्यथा याच खड्ड्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment