RTO अधिकाऱ्याने 10 हजारांची लाच मागितली तरुणाने चक्क कपडे दिले काढून.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, October 15, 2022

RTO अधिकाऱ्याने 10 हजारांची लाच मागितली तरुणाने चक्क कपडे दिले काढून..

RTO अधिकाऱ्याने 10 हजारांची लाच मागितली तरुणाने चक्क कपडे दिले काढून..
सांगली :-लाच घेण्याच्या प्रमाणात वाढ होत असताना, सांगलीमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. यामध्ये आरटीओ कार्यालयामध्ये भ्रष्टाचार किती प्रमाणात चालतो हे दाखवून देणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील आरटीओ कार्यालयाचा आहे. यामध्ये एका आरटीओ अधिकाऱ्याने गाडी पासिंगसाठी लाच मागितल्या नंतर सामाजिक कार्यकर्त्याने चक्क आपले कपडे काढून कार्यालयासमोर गांधीगिरी सुरु केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.काय आहे नेमके प्रकरण ? सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मांडवे हे वाहन पासिंग करण्यासाठी आरटीओ कार्यालयामध्ये गेले होते. त्यावेळी एका आरटीओ अधिकाऱ्याने वाहन पासिंग करण्यासाठी प्रमोद मांडवे या तरुणाकडे दहा हजार रुपयांची लाच मागितली. यानंतर प्रमोद मांडवे यांनी चक्क आपली कपडे काढून गांधीगिरी पद्धतीने अनोखे आंदोलन केले. मांडवे एवढ्यावरच थांबले नाहीतर, कडेगाव येथे भ्रष्ट RTO अधिकाऱ्यांचा हार घालून सत्कार केला.यावेळी RPI आंबेडकर गटाचे जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ, वंचितचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष जीवन करकटे,शेतकरी संघटनेचे जिल्हा युवा अध्यक्ष विजय माळी उपस्थित होते. यानंतर अनेक संघटनांनी एकत्र येऊन भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली.

No comments:

Post a Comment