नवीन सोरतापवाडी शाखा डाकघराचे उद्घाटन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, November 2, 2022

नवीन सोरतापवाडी शाखा डाकघराचे उद्घाटन..

नवीन सोरतापवाडी शाखा डाकघराचे उद्घाटन..
पुणे:- आज दिनांक ०१.११.२०२२ रोजी सोरतापवाडी तालुका हवेली येथे श्री रामचंद्र जायभाये (IPoS),पोस्टमास्तर जनरल, पुणे क्षेत्र यांच्या हस्ते पुणे ग्रामीण टपाल विभाग अंतर्गत नवीन सोरतापवाडी शाखा डाकघराचे उद्घाटन झाले.श्री बाळकृष्ण पोपट एरंडे, अधीक्षक डाकघर पुणे ग्रामीण विभाग यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करत पोस्ट ऑफिस च्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच श्री परमेश्वर क्षिरसागर, वरिष्ठ प्रबंधक इंडिया पोस्ट पेमेंट बँक,
पुणे शाखा यांनी IPPB मार्फत दिल्या जाणाऱ्या विविध योजना व सर्व डीजीटल सेवांची माहिती दिली. श्री सुरेश अण्णा घुले, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष यांनी सोरतापवाडीतील नागरिकांनी पोस्टाच्या जास्तीत जास्त योजनांचा लाभ घ्यावा व आजपासून सोरतापवाडी हे नवीन पोस्ट ऑफिस झाल्यामुळे आता मुक्काम पोस्ट सोरतापवाडी झाले आशा खूप छान प्रकारे त्यांनी माहिती दिली.
श्रीमती संध्याताई चौधरी, सरपंच सोरतापवाडी यांनी पोस्ट ऑफिस चालूकरण्या संदर्भातील प्रक्रीयेसाठी पोस्टऑफिस मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले असे संगीतले व पोस्टाच्या विविध योजनांची
अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायतीतून सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले. तसेच त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित ७५ मुलींचे स्वखर्चानी सुकन्या समृद्धी खाते काढले. या स्तुत्य उपक्रमसाठी माय स्टॅम्प देऊन श्री
रामचंद्र जायभाये यांनी त्यांचा सत्कार केला.
श्री शंकर ज्ञानोबा कड, उप सरपंच सोरतापवाडी यांनी आभार प्रदर्शन केले तसेच सौ रेखा गोडघसे यांनी सूत्रसंचालन केले.या कार्यक्रमास श्री एस. डी. मोरे, सहयाक अधीक्षक मुख्यालय, पुणे ग्रामीण डाक विभाग, श्री दत्तात्रय वऱ्हाडी, सहायक अधीक्षक पुणे क्षेत्रीय कार्यालय, श्री गणेश वडूरकर, सहायक अधीक्षक पुणे ग्रामीण पश्चिम उपविभाग इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment