बक्षीसपात्र भूखंडावर नाव चढवून देण्यासाठी खासगी एजंटामार्फत लाच घेणाऱ्या लाचखोर तहसीलदाराची मालमत्ता किती?झाडाझडती सुरू.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, November 14, 2022

बक्षीसपात्र भूखंडावर नाव चढवून देण्यासाठी खासगी एजंटामार्फत लाच घेणाऱ्या लाचखोर तहसीलदाराची मालमत्ता किती?झाडाझडती सुरू..

बक्षीसपात्र भूखंडावर नाव चढवून देण्यासाठी खासगी एजंटामार्फत लाच घेणाऱ्या लाचखोर तहसीलदाराची मालमत्ता किती?झाडाझडती सुरू..
अलिबाग(प्रतिनिधी) :-जमिनीच्या नोंदी करणे, निकाल आपल्या सारखा व्हावा, वादग्रस्त जमिनीचा निकाल कसा द्यावा त्यासाठी आर्थिक वजन कसे ठेवावे, नेमलेले एजंट कसे अधिकारी यांना टक्केवारी मिळवुन देण्यासाठी धडपड करीत असतात, अश्या विविध मार्गातून व महसुलच्या झालेल्या कारवाईच्या तडजोडीतून लाखो रुपयांची माया कमविणे हाच उद्देश अश्या अधिकारी वर्गाचा झालाय की काय?अशी संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे, लाचखोरीचे प्रमाण इतके वाढले की ते थांबता थाबेना तर प्रकरण अंगाशी आले की बदली करून घ्यायचे असे प्रकार पाहायला मिळत आहे,तर कार्यालयात महत्वाचे विभागात महिलांची नेमणूक करून त्या खात्याच्या विभागाच्या माध्यमातून लाखो रुपये कमविणे हाच धंदा होत असताना दिसत असल्याचं कळतंय, नुकताच एका महिला तहसीलदाराला लाच घेताना पकडले याबाबत माहिती अशी की, बक्षीसपात्र भूखंडावर नाव चढवून देण्यासाठी खासगी एजंटामार्फत दोन लाखांची लाच घेताना सापडलेल्या अलिबागच्या तहसीलदार मीनल दळवी यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढण्याच्या शक्यता आहेत.त्यांच्या घरझडतीतून कोट्यवधींचा ऐवज मिळाला असताना त्यांची स्थावर व जंगम मालमत्ताही त्याहून अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांचे व जवळच्या नातेवाइकांचे विविध बँकांतील खाते आणि मालमत्तेसंबंधी कागदपत्रांची छाननी करण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान,दळवी व एजंट राकेश चव्हाण यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने सोमवारी कोर्टात हजर केले होते. त्यांच्या अलिबाग येथील घराची झडती घेतली असताना ६० तोळ्यांचे सोन्याचे दागिने व रोख २८ हजार रुपये आढळून आले होते. त्यांच्या मुंबईतील विक्रोळी येथील फ्लॅटचीही तपासणी केली असता त्या ठिकाणी एक कोटीची रोकड मिळाली होती. तसेच किमती ऐवज, वाहने विविध बँकांची खाती, खासगी वित्तीय संस्था व कंपन्यांतील ठेवीची प्रमाणपत्रे मिळाली असून, मालमत्तेसंबंधी कागदपत्रे पथकाने ताब्यात घेतली आहेत.अलिबागमधील एका व्यावसायिकाला बक्षीसपात्र जमीन मिळाली असताना त्यावर त्याच्या भावाने आक्षेप घेतला. त्याबाबत तहसीलदार दळवी यांच्याकडे सुनावणी सुरू असताना आक्षेप फेटाळून लावण्यासाठी दळवी यांनी मध्यस्थामार्फत पाच लाखांची मागणी केली होती. अखेर दोन लाखांवर तडजोड झाली. मात्र त्याबाबत व्यावसायिकाच्या जावयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीच्या नवी मुंबईतील पथकाने शुक्रवारी सापळा रचून रक्कम स्वीकारणारा एजंट चव्हाण व तहसीलदार मीनल दळवी यांना अटक केली, बँकांना सुटी असल्याने खात्यांच्या तपशिलाची माहिती मिळू शकली नाही. बँक चालू झाल्यावर त्याबाबत संबंधित बँकांकडे विचारणा करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दळवी यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करीत कोट्यवधींची मालमत्ता जमवली असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली.

No comments:

Post a Comment