*साउथ एशियाई कराटे स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील चार खेळाडूंची निवड* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, November 25, 2022

*साउथ एशियाई कराटे स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील चार खेळाडूंची निवड*

*साउथ एशियाई कराटे स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील चार खेळाडूंची निवड* 

बारामती:- वर्ल्ड कराटे फेडरेशन च्या मान्यतेने साऊथ एशियन कराटे फेडरेशनच्या वतीने दिनांक २७ व २८ नोव्हेंबर २०२२ दरम्यान श्रीलंकेतील कोलोंबो येथे होत असलेल्या "साउथ एशियाई कराटे स्पर्धा २०२२" साठी महाराष्ट्रातील मंथन भोकरे, कार्ल वाच्छा, रिचा सेठ व भुवनेश्र्वरी जाधव यांची भारतीय संघात निवड झाली आहे.

सदर भारतीय संघासाठी स्पर्धा पुर्व राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १३ ते २४ नोव्हेंबर २०२२ दरम्यान डेहराडून येथे आंतरराष्ट्रीय विजेते प्रशिक्षक श्री. हमेद झिकसारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. भारतीय संघ 26 नोव्हेंबर २०२२ रोजी थेट तिथूनच स्पर्धेसाठी श्रीलंकेसाठी रवाना होणार 
आहे. 

सदर स्पर्धेसाठी आपले महाराष्ट्रचे वर्ल्ड कराटे फेडरेशन मान्यताप्राप्त पंच शाहीन अख्तर व अनुप देठे यांची देखील सदर स्पर्धेसाठी भारतातर्फे जाणार्‍या संघात पंच म्हणुन निवड झाली आहे.

सदर स्पर्धेसाठी निवड झालेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंना व पंचांना कराटे इंडिया ऑर्गनायझेशन(KIO) ची मान्यता असेलेल्या कराटे-डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (KAM) या राज्य संघटनेचे अध्यक्ष सलाउद्दीन अन्सारी, सचिव  संदीप गाडे व खजिनदार संदिप वाघचौरे यांनी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment