काळ्या बाजारात जाणारा रेशनिंगचा ३२५ पोती तांदूळ नेताना रंगेहाथ पकडले,पोलिसांची मोठी कारवाई.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, November 23, 2022

काळ्या बाजारात जाणारा रेशनिंगचा ३२५ पोती तांदूळ नेताना रंगेहाथ पकडले,पोलिसांची मोठी कारवाई..

काळ्या बाजारात जाणारा रेशनिंगचा ३२५ पोती तांदूळ नेताना रंगेहाथ पकडले,पोलिसांची मोठी कारवाई..                                                बारामती:-बारामती शहर व तालुक्यात रेशनिंगचा काळा बाजार चालू असल्याचे अनेक वेळा प्रशासकीय यंत्रणेला सांगण्यात येत होत होते परंतु कारवाई होत नव्हती,असे अनेक ठिकाणी रेशनिंगचा काळाबाजार होत असून याबाबत काही कारवाई होतील का हे पाहणे गरजेचे आहे?अशीच कारवाई नुकतीच करण्यात आली याबाबत मिळालेली माहिती अशी की, बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथून रेशनिंग चा तांदूळ काळ्या बाजाराने खरेदी करून विकणाऱ्या दुकानदारास व ट्रक चालकाला वडगाव पोलिसांनी रंगेहात पकडले आहे . संतोष जवाहरलाल शहा ( वय : ५१ ) रा . वडगाव निंबाळकर तालुका - बारामती व ट्रक चालक किशोर एकनाथ सावंत ( वय ४१ ) रा . लिंब . सातारा या दोघां विरोधात वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . Mh 11 m 4415 या ट्रक मधून 2  लाख 66 हजार 850 रुपयांचा 325 नायलॉनच्या पिशव्यात असलेला माल जप्त करण्यात आला आहे . यासंदर्भात वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल पोपट नाळे यांनी या दोघांना विरोधात जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ ( १ ) ( २ ) ( d ) ( e ) , ७ ( १ ) ( a ) ( ii ) यानुसार गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा प्रथम वर्दी रिपोर्ट मा . JMFC कोर्ट बारामती येथे रवाना केला आहे . पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे करीत आहेत .

No comments:

Post a Comment