पोलिस दलात प्रचंड खळबळ...एपीआय सह पीएसआय लाचलुचपतच्या जाळ्यात... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, November 1, 2022

पोलिस दलात प्रचंड खळबळ...एपीआय सह पीएसआय लाचलुचपतच्या जाळ्यात...

पोलिस दलात प्रचंड खळबळ...एपीआय सह पीएसआय लाचलुचपतच्या जाळ्यात...                               जळगाव :- काही पोलीस आरोपींना कसे मदत करतात याची अनेक उदाहरणे व बातम्या पहिल्या असतील अशीच बातमी समोर आली एक याबाबत सविस्तर असे की,अपहार प्रकरणातील आरोपींना अटक न करण्यासाठी लाच मागणाऱ्या सावदा, ता. रावेर पोलिस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक देवीदास इंगोले व उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने अटक केली. या कारवाईने जिल्हा पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.असून नेमकं काय आहे प्रकरण हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता,शहरातील एका दाखल झालेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला अटक न करण्यासाठी सावदा पोलीस स्थानकाचे सपोनि देवीदास इंगोले आणि उपनिरिक्षक समाधान गायकवाड यांनी ६० हजार
रूपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर
१५ हजार इतक्या रूपये देण्याचे ठरले. मात्र ट्रॅपचा संशय आल्याने संबंधितांनी लाच स्वीकारली नसली तरी लाच मागणी सिद्ध
झाल्याने जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक
शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात पथकाने आज
मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास
दोघांना ताब्यात घेतल्याने पोलिस वर्तुळात प्रचंड
खळबळ उडाली आहे.

No comments:

Post a Comment