जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत बारामतीच्या विद्यार्थ्यांचे यश... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, December 4, 2022

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत बारामतीच्या विद्यार्थ्यांचे यश...

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत बारामतीच्या विद्यार्थ्यांचे यश...
 बारामती : - पुणे जिल्हा क्रिडा परिषद व
जिल्हा क्रिडा अधिकारी आयोजित शुक्रवारी (दि. २) नेताजी सुभाषचंद्र बोस स्कूल, फुलगावमध्ये
झालेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेमध्ये १४ वर्षे वयोगटातून विरेन डहाळे हा चौथा क्रमांक आला तर १७ वर्षाखालील समीक्षा मंडले तिसरा क्रमांक व उत्कर्षा मंडले यांना चौथा क्रमांक मिळवून यांनी यश मिळवले.विजयी विद्यार्थ्यांची संघटनेच्या वतीने विभागीय स्पर्धेकरीता निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांना योगेश डहाळे व ज्ञानेश्वर मंडले यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबाबत कौतुकाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment