उद्योगात यशस्वी व्हायचं असेल तर पदाधिकाऱ्यांच्या बरोबर अधिकाऱ्यांच्या ओळखी असणे आवश्यक - पी.टी.काळे - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, December 26, 2022

उद्योगात यशस्वी व्हायचं असेल तर पदाधिकाऱ्यांच्या बरोबर अधिकाऱ्यांच्या ओळखी असणे आवश्यक - पी.टी.काळे

उद्योगात यशस्वी व्हायचं असेल तर पदाधिकाऱ्यांच्या बरोबर अधिकाऱ्यांच्या ओळखी असणे आवश्यक - पी.टी.काळे                                बारामती:- उद्योगात  यशस्वी व्हायचं असेल तर पदाधिकाऱ्यांच्या बरोबर अधिकाऱ्यांच्या ओळखी असणे आवश्यक आहे कारण महाराष्ट्र शासनाच्या किंवा केंद्राच्या योजनेची माहिती हवी असेल तर अधिकाऱ्यांच्याकडे उपलब्ध असते त्यांच्या गाठीभेटी घेणे योजनेची चौकशी करणे प्रक्रिया कशी असावी त्याची माहिती करून घेणे त्यामुळे उद्योग उभा करणे सोयीचे ठरते असे  प्रतिपादन उद्योग व्यवसाय मार्गदर्शक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य पी टी काळे यांनी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या मेळाव्यामध्ये केले आहे तसेच ते पुढे म्हणाले बारामती शहराचा विकास झालेला आहे परंतु काही उद्योग बारामती मध्ये उपलब्ध नाही ते उद्योग सुरू करण्यासाठी उपाय योजना आपणास सुईचा आहे गरजेचा आहे त्यामध्ये गृह उद्योग महिलांना घरबसल्या काम मिळवून देणे लघुउद्योग तरुणांना निर्माण करून देणे तसेच शासकीय अनुदाना मधून दहा कोटी तीस कोटी 50 कोटी पर्यंतचे क्लस्टर उभा करणे 250 कोटीपर्यंतचा फूड पार्क प्रोजेक्ट उभा करणे अशी सुवर्णसंधी बारामतीकरांना असल्याबाबत  त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले,

गरजूंना उद्योगात तांत्रिक माहिती आवश्यकअसल्यास माझा नंबर  95 88 438 418 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन केले: दिनांक 25 डिसेंबर 2022 रोजी बारामती येथे जिजाऊ भवन येथे अखिल भारतीय मराठा महासंघाचा मेळावा पार पडला त्यामध्ये महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे साहेब, पी टी काळे महाराष्ट्र राज्य उद्योग व्यवसाय मार्गदर्शक तसेच उद्योजक नामदेव तुपे अध्यक्ष मराठा सेवा संघ सचिन सातव उद्योजक बारामती बँकेचे चेअरमन तसेच  भिमाजी नाना होळकर  व्यापारी सेलचे अध्यक्ष वैभव शिंदे पुणे जिल्हा व्यापारी सेलचे उपाध्यक्ष पंकज सावंत आणि बारामती तालुक्यातील व शहरातील मराठा महासंघाचे पदाधिकारी शितोळे साहेब, माने साहेब, देशमुख साहेब, व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment