माळेगाव पोलीस स्टेशन ची दमदार कामगीरी करीत एका आरोपीसह २ गावठी पिस्टल सह १ जिवंत काडतुसे जप्त.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, December 26, 2022

माळेगाव पोलीस स्टेशन ची दमदार कामगीरी करीत एका आरोपीसह २ गावठी पिस्टल सह १ जिवंत काडतुसे जप्त..

माळेगाव पोलीस स्टेशन ची दमदार कामगीरी करीत एका आरोपीसह २ गावठी पिस्टल सह १ जिवंत काडतुसे जप्त..
बारामती:- मागील काही दिवसापासून पुणे जिल्हयामध्ये अनेक ठिकाणी गुन्हयाचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने मा. पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी पुणे ग्रामीण जिल्हयामध्ये
अग्निशस्त्र जप्ती करणेकामी कोम्बींग ऑपरेशन तसेच अभिलेखावरील संशयित आरोपीची वाहन
झडती तसेच घरझडतीचे अभियान चालु होते. त्याचे सुचनाचे पालन करत मा पोलीस निरीक्षक
किरण अवचर यांनी आपल्या पथकाला सोबत घेवुन गावठी पिस्टल ची शोध मोहीम हाती घेतली
.हददीमधील संशयित आरोपीचे वाहन घर झडती घेण्याचे काम चालु होते.माळेगाव पोलीस स्टेशनचे हदिदतील लकडेनगर येथील एका इसमाचा सोशल मिडीया वरील व्हिडीओ पथकातील पोलीस अंमलदार राहुल पांढरे व विजय वाघमोडे यांना प्राप्त झाला त्यानुसार पथकातील पोसई साळवे, पोलीस अंमलदार राहुल पांढरे, विजय वाघमाडे, ज्ञानेश्वर मोरे यानी बातमीदारामार्फत बातमी मिळविण्याचा प्रयत्न केला तेव्हा बातमीदारामार्फत ता.२५/१२/२०२२ रोजी दुपारी २२/३० वाचे सुमारास किरण अवचर हे पोलीस स्टेशन ला हजर असताना त्याना गोपनीय बातमीदाराचा फोन आला की मौजे माळेगाव पिरबाब दर्गा मैदान येथे एक इसम गावठी पिस्टल विक्री करणेकरीता येणार असलेबाबत खात्रीशिर बातमी मिळाली तेव्हा
पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी पथकाला बोलावुन सदर बातमी चा आशय सांगुन सदर
इसमावर कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश दिले .त्यानंतर पथक रवाना होवुन माळेगाव
पिरबाब दर्गा मैदान येथे सापळा रचुन बसले असता त्यावेळी २१/४५ वाजे दरम्यान एक इसम
संशयीत हालचाली करताना दिसला तेव्हा त्यास पथकातील स्टाफ ने इसमास ताब्यात घेतले
त्यास त्याचा नाव पत्ता विचारले असता त्याचे नाव आकाश सुरेश हजारे वय २४ वर्षे रा शिंदेवाडी ता.माळशिरस जि. सोलापुर सध्या रा. लकडेनगर माळेगाव ता. बारामती जि. पुणे असे सांगितले असुन सदर सोशल मिडीया वरील व्हिडीओ हा सदर इसमाचा असलेबाबत खात्री झाली. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला खालील वर्णनाचा मुद्देमाल मिळुन आला
आहे १) ५०,०००/- रुपये किमतीचे २ गावठी पिस्टल अनुक्रमे काळे व सिल्वर रंगाचे बाजुस
लाल रंगाची पटटी असलेले लोंखडी धातुचे मॅगझीन सह कि अं.३०० /- रुपये किंमतीचे एक जिंवत काडतुस त्याचे पाठिमागील बाजुस पितळी ७.६५ के एफ मार्क कि अं.५०,३०० रुपये किंमतीचे २ गावठी पिस्टल १ जिंवत काडतुस जप्त करुन आरोपी याचे वर भारतीय शस्त्र अधिनियम ३ (२५), ५ (२५) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम क. १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गन्हयाचा अधिक तपास पोसई देविदास साळवे हे करीत आहेत
सदरची कामगीरी मा.पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागिय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक किरण अवचर यांचे
मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस स्टेशनचे विषेश पथकातील पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे, सहा. फौजदार जयवंत ताकवणे, पोलीस अंमलदार राहुल पांढरे, विजय वाघमोडे, ज्ञानेश्वर मोरे,नंदकुमार गव्हाणे, जयसिंग कचरे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment