शरयु ॲग्रोचा एकरकमी २७७५ रूपये दर जाहीर.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, December 4, 2022

शरयु ॲग्रोचा एकरकमी २७७५ रूपये दर जाहीर..

शरयु ॲग्रोचा एकरकमी २७७५ रूपये दर जाहीर..
 निमगाव :- शरयु ॲग्रो इंडस्ट्रीज लि. चा चालू
गळीत हंगाम सन २०२२-२३ करिता शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन प्रति मे.सर्वाधिक उचांकी २७७५ रुपये दर जाहीर करण्यात आला आहे.
लवकरच बिले ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करणार असल्याची माहिती कार्यकारी संचालक युगेंद्र पवार यांनी दिली.
'शरयु' चे चेअरमन श्रीनिवास पवार, संचालिका शर्मिला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी संचालक युगेंद्र पवार यांच्या कुशल नेतृत्वाखाली शरयुची वाटचाल यशस्वीरित्या चालू
आहे. सर्व ऊस उत्पादक शेतकरी, ऊस
वाहतूकदार, तोडणी कामगार, पुरवठादार
कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याने हंगाम यशस्वी पार पडणार असल्याचा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे.शरयु कारखान्याने आज अखेर
२ लाख ८५ हजार मे. टनांचे विक्रमी गाळप केले असून गाळपात व ऊस दरात तालुक्यात
आघाडी घेतली आहे.कारखान्याचा डिस्टलरी
प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाला आहे. यावर्षीही अल्कोहोल इथेनॉलचे विक्रमी उत्पादन घेऊन राज्यात अग्रेसर राहील याचे नियोजन करण्यात आले आहे. गतवर्षीप्रमाणे याही हंगामात माळशिरस, फलटण, कोरेगाव, वाई,
खंडाळा, सातारा, भोर, पुरंदर, बारामती,
इंदापूर, माण, खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला ऊस गत वर्षी प्रमाणे याहीवर्षी शरयु कारखान्याला घालून सहकार्य करावे असे आवाहनही युगेंद्र पवार यांनी केले.

No comments:

Post a Comment