*कटफळला झैनबिया स्कूलमध्ये सामाजिक एकत्रीकरण मॅरेथॉन उपक्रम उत्साहात* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, December 12, 2022

*कटफळला झैनबिया स्कूलमध्ये सामाजिक एकत्रीकरण मॅरेथॉन उपक्रम उत्साहात*

*कटफळला झैनबिया स्कूलमध्ये सामाजिक एकत्रीकरण मॅरेथॉन उपक्रम उत्साहात*
*_झैनबिया स्कूलमध्ये महिला मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात_*
 
कटफळ(बारामती):-  येथील अब्बास मोहम्मद हुसेन एज्युकेशन ट्रस्ट संचलित स्कूल (सीबीएसई) ने मुलींसाठी व महिलांसाठी सामाजिक एकत्रीकरण सेवा कार्यांतर्गत 4.4 व 8.8 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. या मॅरेथॉनची सुरुवात झैनबिया स्कूल पासून ते रेल्वे स्टेशन सर्कल पर्यंत होते. या मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन बारामतीचे डी वाय.एस.पी. श्री.गणेश इंगळे साहेब तसेच बारामतीचे आर्यनमॅन. युसुफ कायमखानी व प्राचार्या इन्सिया नासिकवाला व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये बारामती व फलटण तालुक्यातील विविध शाळा, कॉलेज व विविध क्षेत्रातील 248 मुलींनी व महिलांनी सहभाग नोंदवून मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पाडली.
          या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये मुलींमध्ये प्रथम क्रमांक:- कु‌‌.आर्या मदने, कटफळ द्वितीय क्रमांक:-कु. नेहा गावडे,फलटण व तृतीय क्रमांक:- कु‌.साक्षी गावडे, फलटण यांनी मिळविला. तसेच महिलांमध्ये प्रथम क्रमांक:-सौ.कविता राठोड, द्वितीय क्रमांक:-सौ.वनिता मचाले व तृतीय क्रमांक:-सौ.अर्चना भोसले यांनी मिळविला व चतुर्थ क्रमांकाने श्रेया सिंग, किरण मदने, अर्चना मेत्रे यांना मिळाला.
            या मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीतेसाठी  प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामीण पोलीस, हेल्थ मार्ट, जानाई टेक्सस्टाईल, धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर्स, कोठारी गारमेंट्स, प्रिझम कोचिंग क्लासेस, राजापुरी भेळ आदी यांचे मोलांचे सहकार्य लाभले. या उपक्रमांमधून इयत्ता 9वीचे मुले विविध कौशल्य आत्मसात करतात जसे की निधी उभारणी, जाहिराती, ब्रॅण्डिंग, टीमवर्क, नेतृत्व,उद्योजकता, निर्णय घेणे, रुग्ण, शिस्त, असे बरेच काही, अशी माहिती क्रीडाशिक्षक आप्पासाहेब देवकाते सर यांनी दिली.

No comments:

Post a Comment