हायवा डंपर ने घेतला एकाचा बळी... RTO विभागाला आत्ता तरी येईल का जाग? - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, December 2, 2022

हायवा डंपर ने घेतला एकाचा बळी... RTO विभागाला आत्ता तरी येईल का जाग?

हायवा डंपर ने घेतला एकाचा बळी... RTO विभागाला आत्ता तरी येईल का जाग?                                                                               बारामती:-बारामतीत वाळू, मुरूम,खडी,कच, व इतर वाहतूक प्रमाणापेक्षा जास्त ओव्हर लोड वाहतूक वाढली असून याकडे  RTO कार्यालय काना डोळा करीत असल्याचे दिसत असून फक्त थोडी फार कारवाई केल्याचं दाखवून पुन्हा ही वाहतूक चालूच असते याबाबत वारंवार तक्रारी करूनही का दखल घेतली जात नाही याबाबत लवकरच गौप्यस्फोट करणार असून याबाबत संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकारी यांना माहिती देणार असल्याचे कळतंय, बारामतीत अपघातात वाढ होत असल्याचे दिसत असताना पुन्हा अपघात झाला, या अपघातात बारामती भारत फोर्स कंपनी समोर एका दोन चाकी मोटरसायकल स्वारकास हायवा डंपर ने उडवले त्या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला ,बारामती एमआयडीसी येथे मोठमोठ्या कंपन्या व त्या ठिकाणी असलेली वर्दळ पाहता अपघाताचे प्रमाण वाढू लागले आहे यामध्ये
 24 तास वाहत असलेल्या रस्त्यावर वाहतूक चालू असते, याठिकाणी ये जा करणारे नागरिक जीव मुठीत घेऊन चालत असतात, कामावरून सुटणारी कामगारांची गर्दी. आणि विशेष म्हणजे यारस्त्यालगतच क्षेत्रीय परिवहन कार्यालय देखील आहे,बारामती मध्ये घडत असलेले अशा अपघातांना रोखण्यासाठी कदाचित RTO कार्यालय येथील अधिकारी व कर्मचारी कमी पडत असल्याचे स्थानिक नागरिकांमधून सांगण्यात येत आहे. अशा मध्येच भारत फोर्स कंपनीसमोर हायवा डंपर खाली दुचाकी स्वार मृत्यू मुखी झाला,घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी सांगितले,अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेला व्यक्ती हा बारामती तांदुळवाडी- दादा पाटील नगर येथील ताटे आडनाव असून अपघात अत्यंत भयानक होता या अपघाताची
माहिती सांगितल्यानंतर हा डंपर नंबर MH.43.Y.6160 एकदम वेगाने आपले
वाहन चालवत असल्याचे प्रत्यक्षदर्शीय मदतीसाठी उपस्थित असलेल्या नागरिकांकडून समजते यामध्ये दुचाकी स्वारकाचा नजीकच्या महिला हॉस्पिटल येथेनेल्यानंतर सदर मृत्यू झाल्याचे समजते, घटनेची माहिती स्थानिकांनी कळविलेणे त्या ठिकाणी पोलीस तातडीने उपस्थित राहून अपघाताची माहिती घेऊन अधिक तपास करीत आहे.                                    वाळू, खडी, मुरूम, माती वाहतूक करणारे ओव्हर लोड वाहने स्पीड ब्रेकर किंवा खड्ड्यात आपटल्याने गाडीतून खाली सांडलेले कच, खडी, वाळू, मुरूम मागील येणाऱ्या वाहनाना धोकादायक झाले असून अनेक वेळा घसरून अपघात झाले असल्याचे दिसते यामुळे कारवाई होणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment