बारामती येथे शुक्रवार 27 जानेवारी रोजी श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पादुका पालखीचे आगमन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 24, 2023

बारामती येथे शुक्रवार 27 जानेवारी रोजी श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पादुका पालखीचे आगमन..

बारामती येथे शुक्रवार 27 जानेवारी रोजी श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पादुका पालखीचे आगमन..

बारामती:- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अक्कलकोट यांच्यावतीने महाराष्ट्र पादुका परिक्रमा अंतर्गत महाराष्ट्रात अनेक गावांमध्ये श्री स्वामी समर्थांच्या पादुकांच्या पालखीचे आयोजन करण्यात येत असते. त्यानुसार बारामती येथे श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पादुका पालखीचे शुक्रवार दि. 27 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 5 वाजतां आगमन व स्वागत बारामती शहरात होणार आहे. सायंकाळी 7 ते 7.30 वाजता महाआरती व नामस्मरणाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री 8 वाजतां श्री स्वामी भक्ती गीतांचा कार्यक्रम होणार आहे तसेच रात्री 10 वाजेपर्यंत महाप्रसाद अन्नदानाचे आयोजन सर्व स्वामी भक्‍तांसाठी करण्यात आले आहे. सर्व कार्यक्रम रयत भवन, मार्केट यार्ड, इंदापूर रोड, बारामती येथे होणार आहेत. तसेच शनिवार 28 जानेवारी रोजी सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत श्री स्वामी समर्थ पादुकांचा सार्वजनिक अभिषेक कार्यक्रम होणार असून ज्या भाविकांना अभिषेक मध्ये सहभाग घ्यायचा असेल त्यांनी येताना दूध घेऊन यावे असे आवाहन आयोजक श्री स्वामी समर्थ मठ उत्सव समिती, महावीर पथ, बारामती यांच्या वतीने श्री राजाभाऊकाका थोरात यांनी केले आहे. सकाळी 11 वाजता श्री स्वामी समर्थ पादुका पालखी पुढील गावी रवाना होणार आहे. तरी सर्व बारामतीमधील भक्‍तांनी श्री अक्‍कलकोट स्वामी समर्थ पादुका दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment