बेवारस महिला मयताचा व त्याचे नातेवाईकांचा शोध होणेसाठी बारामती पोलीस स्टेशन ने केले आवाहन... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 24, 2023

बेवारस महिला मयताचा व त्याचे नातेवाईकांचा शोध होणेसाठी बारामती पोलीस स्टेशन ने केले आवाहन...

बेवारस महिला मयताचा व त्याचे नातेवाईकांचा शोध होणेसाठी बारामती पोलीस स्टेशन ने केले आवाहन...
बारामती:- बारामती शहर पोलीस ठाणे, पुणे ग्रामिण.हद्दीत 02/2023 सी.आर.पी.सी. 174 प्रमाणे संदेश शिवराम भोपळे, वय 49 वर्ष, व्यवसाय शेती, रा. डोलवाडी, ता.बारामती यांना
अनोळखी स्त्री जातीचे प्रेत अंदाजे 35 ते 40 वर्ष
मोजे डोर्लेवाडी गावच्या हद्दीत काळकोटे वस्तीजवळ असलेल्या शिवराम ज्ञानबा भोपळे
यांचे मालकीचे शेतजमीन गट नंबर 668 मध्ये, ता. बारामती, जि. पुणे येथे दिनांक 22/01/2023 रोजीचे 5.30 वा. सुमारास च्या दिसले एक स्त्री जातीचे अंदाजे 35 ते 40 वर्ष वयाचे सडलेला मृतदेह तिच्या कमरेला साडीची गाठ,अबोली रंगाची साडी तीच्यावर फुलांची डिझाईन असलेली व बाकी साडी इतरत्र पसरलेली, पांढ-या रंगाचे बटन असलेला लाल रंगाचा ब्लाऊज बाजूला पडलेला, डोकीस काळे केस पसरलेले, दोन्ही हात खांद्यापासून नाहीत, उजवे पायाचे मांडीपासून मास कोणत्यातरी प्राण्याने खाल्लेले त्यामुळे पायाचे हाड दिसत असलेले, डाव्या पायाचा पंजा नसून तेथे आळ्या पडलेल्याअवस्थेत होती याबाबत मिळालेली माहिती अशी आहे की, यातील खबर देणार हे शेतामध्ये शेवरीचा पाला शेळ्यांसाठी काढत असताना वर नमूद वर्णनाची मयत बेवारस श्री जातीचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षाचे प्रेत हे सडलेल्या स्थितीत मिळून आल्याबाबत खबर दिल्याने बारामती शहर पोलीस ठाणेस दिनांक 22/01/2023 रोजी सी.आर.पी.सी. 174 प्रमाणे मयत दाखल करण्यात आली तात्काळ घटनास्थळी पोलीस पोहचले व सदर घटनेचा जागेचा पंचनामा करून ग्रामीण रुग्णालय, रूई, ता. बारामती येथे दाखल करण्यात आले असून मयत बॉडीचे सिल्व्हर ज्युबलीचे वैद्यकीय अधिकारी यांनी ग्रामीण रूग्णालय, रूई येथे पी.एम. केले असून बॉडी संपुर्ण कुजलेली असल्याने मरणाबाबत अभिप्राय दिलेला नाही.
तरी सदर मयताचा व नातेवाईकांचा तपास होणेसाठी अवाहन करण्यात आले. तरी सदर याबाबत कोणाला माहित असल्यास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक मोबाईल क्रमांक- 98 23 56 22 55, पीएसआय निंबाळकर-
9588453253, बारामती शहर पोलीस स्टेशन-
9552069100 या क्रमांकावर संपर्क करावा.

No comments:

Post a Comment