त्या... ७ जणांची आत्महत्या नव्हती तर हत्या होती, आली धक्कादायक माहिती पुढे.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 25, 2023

त्या... ७ जणांची आत्महत्या नव्हती तर हत्या होती, आली धक्कादायक माहिती पुढे..

त्या... ७ जणांची आत्महत्या नव्हती तर हत्या होती, आली धक्कादायक माहिती पुढे..
दौड:- पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीपात्रात ६ दिवसांमध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांचे मृतदेह आढळले. या सात जणांनी सामुहिक आत्महत्या  केल्याचे
म्हटले जात असतानाच आता त्याला वेगळे वळण
मिळाले आहे. त्यांच्या ४ चुलत भावानींच त्यांचा खून करुन मृतदेह नदीत फेकले असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी  चौघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे अधिक चौकशी करण्यात येत आहे. याबाबतची अधिकृत माहिती दुपारनंतर जाहीर केली जाईल, असी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकीत गोयल  यांनी दिली आहे. मोहन पवार हे यांच्या चुलत भावाने हे कृत्य केल्याचे हे समोर आले आहे.
मोहन पवार यांचा मुलगा बरोबर असताना तीन ते चार महिन्यांपूर्वी चुलत भावाच्या मुलाचा अपघात झाला होता. तो मुलगा हॉस्पिटलमध्ये असतानाही मोहन पवार व त्यांच्या मुलाने ही बाब त्यांना सांगितली नाही.४ दिवसानंतर मुलाच्या अपघाताची माहिती चुलत भावाला मिळाली. त्यानंतर त्या मुलाचा मृत्यु झाला होता. या घटनेचा राग मनात धरुन चार चुलत भावांनी
या सर्वांची हत्या करुन त्यांचे मृतदेह नदीत फेकून
दिल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी त्यांच्याकडे अधिक चौकशी करीत आहेत.

No comments:

Post a Comment