*सत्संग हेच सुखाचे अंतिम द्वार आहे.- किशोर माने जी* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, January 1, 2023

*सत्संग हेच सुखाचे अंतिम द्वार आहे.- किशोर माने जी*

*सत्संग हेच सुखाचे अंतिम द्वार आहे.- किशोर माने जी*
    
     बारामती: - आजचा माणूस भौतिक साधनं गोळा करण्याच्या नादात आत्मिक सुख हरवून बसला आहे, जर हे आत्मिक सुख प्राप्त करायचं असेल तर सत्संग केल्याशिवाय पर्याय नाही कारण सत्संग हेच सुखाचे अंतिम द्वार आहे असे मत बारामती क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक किशोर माने यांनी व्यक्त केले.
     दोन हजार तेवीस या नविन वर्षाच्या निमित्ताने येथील सत्संग भवनात संत निरंकारी मिशन बारामती क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक किशोर माने यांच्या उपस्थितीत रविवारी (ता.१) विशेष सत्संगाचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.
     या सत्संगला बारामतीसह परिसरातील निरंकारी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होता.
     बदललेल्या नवीन वर्षाबद्दल सांगताना श्री. माने म्हणाले वर्ष हे दरवर्षी बदलणारच आहे, पण त्याबरोबरच आमचा स्वभाव आणि विचारांमध्येही बदल झाला पाहिजे अशी आशा व्यक्त केली.
      तसेच पुढच्या रविवारी याठिकाणी सातारा झोनचे झोनल  इन्चार्ज नंदकुमार झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा सत्संग होणार असून हा सत्संग संत निरंकारी मंडळ रजी. दिल्ली ब्रँच प्रशासन मेम्बर इंचार्ज मोहन छाब्राजी यांच्या प्रमुख उपस्थितीत विशाल सत्संग होणार आहे, या सत्संगला बारामतीसह इंदापूर, फलटण तालुक्यातील मोठा जनसमुदाय उपस्थित राहणार आहेत. तरी या विशेष सत्संगचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहनही श्री. माने यांनी केले.

No comments:

Post a Comment