खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने घेतला अचानक पेट; अनर्थ टळला! पुणे:-पुणे येथील हिंजवडी भागामध्ये कराटे कोचिंग क्लासेसचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी दीपप्रज्वलित केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालताना सुप्रिया सुळे यांच्या पुतळ्याजवळील दिव्याकडे लक्ष गेले नाही. त्यामुळे हार घालत असताना या दिव्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या साडीने अचानक पेट घेतला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने पेट घेतला. लक्षात येताच सुप्रिया सुळेंनी तातडीने ही आग विझवली. त्यामुळे कोणतीही दुर्घटना झाली नाही. या घटनेत सुप्रिया सुळे यांना कोणतीही इजा झाली नाही. तसेच, घटनेनंतर पुढील कार्यक्रमातही त्या सहभागी झाल्या. पुण्यात
सुप्रिया सुळे यांचे आज अनेक कार्यक्रम आहेत.
घटनेमुळे कोणताही परिणाम होणार नाही. सुप्रिया सुळे सर्व नियोजित कार्यक्रमांना हजेरी लावणार असल्याची माहिती आहे.सुप्रिया सुळे यांच्या साडीने पेट घेतल्याचे समोर असलेल्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. सुप्रिया सुळे यांनी तातडीने हे सुप्रिया सुळे यांच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर तातडीने सुप्रिया सुळे यांनी
आग विझवली. सुप्रिया सुळे यांना कोणतीही हानी झाली नाही.घटनेबाबत सुप्रिया सुळे यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की,बारामती लोकसभा मतदारसंघातील हिंजवडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कराटे स्पर्धेचे उद्घाटन करीत असताना अनवधानाने साडीने पेट घेतला. पण वेळीच ती आग आटोक्यात आणण्यात आली. आमचे हितचिंतक, नागरीक, कार्यकर्ते व
पदाधिकारी यांना माझी विनंती आहे, की मी
सुरक्षित असून कृपया कुणीही काळजी करु नये.
आपण दाखवित असलेले प्रेम, काळजी माझ्यासाठी मोलाचे आहे. आपणा सर्वांचे मनापासून आभार.
No comments:
Post a Comment