अजित पवाराच्या विरोधात भाजपने बारामतीमध्ये निषेधाच्या घोषणा देत काढला मोर्चा.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, January 2, 2023

अजित पवाराच्या विरोधात भाजपने बारामतीमध्ये निषेधाच्या घोषणा देत काढला मोर्चा..

अजित पवाराच्या विरोधात भाजपने बारामतीमध्ये निषेधाच्या घोषणा देत काढला मोर्चा..
बारामती:- धर्मवीर संभाजी महाराजांच्या विरोधात अजित पवारांनी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये धर्मवीर संभाजी महाराज धर्मवीर नव्हते असा अतिशय संतापजनक प्रश्न उपस्थित केल्यामुळे व एकेरी उल्लेख केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे पडसाद उमटले आणि त्याचाच भाग म्हणून बारामतीमध्ये सुद्धा अजित पवाराच्या विरोधात निषेधाच्या घोषणाने बारामती दुमदुमून गेली. 
भाजपा बारामतीच्या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या संख्येने संपूर्ण बारामतीमध्ये अजित पवाराच्या विरोधात मोठी रॅली काढून निषेध नोंदविण्यात आला. 
यावेळेस पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष गणेशातात्या भेगडे, भाजपा प्रदेशचे सरचिटणीस व माजी महापौर  मुरलीधर अण्णा मोहोळ, संघटन सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे, यांनी भाषण करून निषेध नोंदवला.जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामटे ,बाळासाहेब गावडे ,दिलीप खैरे ,रंजनकाका तावरे ,अविनाश मोटे, तानाजी थोरात,सुरेंद्र जेवरे,मारुतीअण्णा वनवे , देवेंद्र बनकर,माऊली चवरे, युवराज मस्के,ॲड शरद जामदार, जीवन आप्पा कोंडे आणि पुणे जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते,या कार्यक्रमाचे आयोजन बारामती शहराध्यक्ष सतीश फाळके ,तालुकाध्यक्ष पांडुरंग मामा कचरे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष ॲड गोविंद देवकाते ,राजेश कांबळे,शहाजी कदम ,ॲड.जी के देशपांडे , प्रमोद खराडे, भारत देवकाते,ॲड ज्ञानेश्वर माने, सुनील माने, युवराज तावरे, प्रमोद तावरे,अभिजीत देवकाते, प्रमोद डिंबळे, पोपटराव खैरे,अक्षय गायकवाड,रघु चौधर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
निषेध मोर्चाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे व आभार शहराध्यक्ष सतीश फाळके यांनी मांडले.

No comments:

Post a Comment