अभिसार फाउंडेशन च्या "पारसचे" रोलीग स्केटिंग मध्ये गोल्ड मेडल.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 3, 2023

अभिसार फाउंडेशन च्या "पारसचे" रोलीग स्केटिंग मध्ये गोल्ड मेडल..

अभिसार फाउंडेशन च्या "पारसचे" रोलीग स्केटिंग मध्ये गोल्ड मेडल..

पुणे:-भारतीय रोलर स्केटिंग महासंघ याच्या वतीने दिव्यांग खेळाडूंची ६०  वी नॅशनल रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा दिनांक ११ ते २२  डिसेंबर २०२२ रोजी बंगलोर येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत भारतातील ११ राज्यातील एकूण ५३ ऑटिझम (दिव्यांग) खेळाडूंनी सहभाग घेतला होता .महाराष्ट्रातील ८ खेळाडूंनी यात सहभाग घेतला होता या मध्ये अभिसार फाउंडेशन वाकड येथील दिव्यांग शाळेतील ऑटिझम खेळाडूं" पारस विवेक  पाटील " याने नेत्रदीपक  कामगिरी करून महाराष्ट्रासाठी `गोल्ड मेडल ' मिळवले .त्याच्या या कामगिरीबद्दल स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रा.पी के सिंग यानी त्याचे कौतुक केले आहे .पारस च्या या यशामध्ये त्याचे वडील विवेक पाटील यांचे खुप मोठे योगदान आहे.अभिसार फाउंडेशन चे क़िडा प्रशिक्षक विकास जगताप व त्रषीकेश मुसडगे यांचे त्याला मागंदश॔न लाभले.

No comments:

Post a Comment