*युवकांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावून लोकशाही बळकट करावी-प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 25, 2023

*युवकांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावून लोकशाही बळकट करावी-प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे*

*युवकांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावून लोकशाही बळकट करावी-प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे*
                                                                       
बारामती, दि. २५ :- युवकांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावून भारतीय लोकशाही बळकट करावी आणि नागरीकांमध्ये मतदानाविषयी जनजागृतीचे कार्य करण्यात महत्त्वाचे योगदान द्यावे, असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले.

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त तहसील कार्यालय येथे प्रांताधिकारी श्री. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली १३ वा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तहसीलदार विजय पाटील, परीविक्षाधीन तहसीलदार नेहा शिंदे, निवडणूक नायब तहसीलदार प्रतिभा शिंदे, नायब तहसीलदार सुवर्णा ढवळे, तुषार गुजवटे, शाळांचे प्राचार्य, सहकारी शिक्षक, मार्गदर्शक, पालक, तहसील कार्यालयातील कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, मतदान हे लोकशाहीने आपल्याला दिलेले महत्वाचे कर्तव्य आहे. मतदान करून आपला हक्क व जबाबदारी पूर्ण करणे हे प्रत्येक मतदाराचे कर्तव्य आहे. लोकशाही बळकट करण्याचे काम मतदार नोंदणीतून आणि मतदानामध्ये सक्रीय सहभागातून होत असल्याने युवकांनी यात पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले.

वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक पात्रताधारक भारतीय नागरिकाने मतदानाचा पवित्र हक्क बजावावा यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. त्याअंतर्गत तहसिल कार्यालयाच्या निवडणूक शाखेमार्फत बारामतीतील धो. आ. सातव (कारभारी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात रांगोळी, निबंध, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा घेवून मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. तसेच शाहू हायस्कूल आणि धो. आ. सातव (कारभारी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयायातील विद्यार्थ्यांनी आज सायकल रॅली व्दारे शहरात मतदान जनजागृती केली. 

कार्यक्रमात उपस्थितांनी राष्ट्रीय मतदान दिनाच्या प्रतिज्ञेचे वाचन केले. यावेळी स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा व मतदान नोंदणीमध्ये उत्कृष्ठ काम करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा  प्रांताधिकारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, पारितोषिक व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. 

निवडणूक आायोगाचा २५ जानेवारी हा स्थापना दिवस देशभरामध्ये राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. मतदारामंध्ये मतदाना विषयी जनजागृती व्हावी, नवीन मतदार नोंदणी व्हावी या उद्देशाने या दिवशी वेगवेगळया कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मतदानासारख्या पवित्र कर्तव्यापासून कोणी वंचित राहू नये, असेही श्री. कांबळे यावेळी म्हणाले.
                             0000

No comments:

Post a Comment