साहित्यिक ताराचंद्र आवळे लिखित संघर्ष चरित्र ग्रंथाचे शनिवारी अकलूज येथे प्रकाशन. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, January 30, 2023

साहित्यिक ताराचंद्र आवळे लिखित संघर्ष चरित्र ग्रंथाचे शनिवारी अकलूज येथे प्रकाशन.

साहित्यिक ताराचंद्र आवळे लिखित संघर्ष चरित्र ग्रंथाचे शनिवारी अकलूज येथे प्रकाशन. 
बारामती:- संघर्षमय जीवन जगत संघर्षातून समृद्धीचा मार्ग शोधणारे आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व म्हणजे अकलूज येथील प्रतिथयश बालरोगतज्ज्ञ ,अँपेक्स हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ राजीव राणे कविटकर, यांचा संघर्षमय जीवनाचा प्रवास माणदेशी साहित्यिक  ताराचंद्र आवळे यांनी सिद्धहस्त लेखणीने शब्दबद्ध  केला आहे. 'संघर्ष ' या चरित्र ग्रंथाचे  प्रकाशन शनिवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी कृष्णप्रिया मंगल कार्यालय अकलूज येथे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व महाराष्ट्र विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य आबासाहेब देशमुख उपस्थित राहणार आहेत. माजी प्राचार्य व प्रसिद्ध वक्ते रविंद्र येवले हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी कोल्हापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण, पुण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर, अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या प्रकाशन सोहळ्यास वैद्यकीय, साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती  सौ. शीतल राणे कविटकर,डॉ. नितीन राणे कविटकर, डॉ. मनीष राणे कविटकर, डॉ. सौ. रेवती राणे कविटकर , डॉ. सौ. स्नेहल राणे कविटकर तसेच साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन फलटणच्या समन्वयक व प्रकाशक प्रा. सौ. सुरेखा आवळे यांनी दिली असून साहित्य क्षेत्रातील जास्तीत जास्त साहित्यप्रेमी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment