हादरवणारी घटना.. महिला नायब तहसीलदार यांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, January 20, 2023

हादरवणारी घटना.. महिला नायब तहसीलदार यांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न..!

हादरवणारी घटना.. महिला नायब तहसीलदार यांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न..!                                                           बीड :- महाराष्ट्रात धक्कादायक घटना
घडली तीही बीड जिल्ह्यात केजच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांना भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सरकारी अधिकाऱ्यावर हल्ला झाल्याने केज शहरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यातून त्या थोडक्यात बचावल्या असून त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार  सुरु आहेत. कौटुंबिक वादातून आशा वाघ
यांच्यावर हल्ला झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यापूर्वीही कौटुंबिक वादातून त्यांच्या भावानेच त्यांच्यावर हल्ला केला होता. ही घटना शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास घडली.
आशा वाघ या केज तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार आहेत.भररस्त्यात जीवघेणा हल्ला झाल्याची थरारक घटना घडली आहे. नायब तहसीलदार आशा वाघ शुक्रवारी दुपारी जेवण
करुन तहसील कार्यालयाकडे मोपेडवरुन येत होत्या.त्याचवेळी एका चारचाकी वाहनाने त्यांचा रस्ता आडवला.त्यातून उतरलेल्या एका महिलेसह इतर चार जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी बॉटलमधून आणलेले पेट्रोल वाघ यांच्यावर टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. परंतु या हल्ल्यात आशा वाघ थोडक्यात बचावल्या. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले
आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी
घटनास्थळी धाव घेत आरोपींचा शोध सुरु केला असून अधिक तपास करीत आहे.

No comments:

Post a Comment