*दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना उप माहिती कार्यालयात अभिवादन*
बारामती दि.६ :- मराठीतील पहिल्या ‘दर्पण’ या वृत्तपत्राच्या आरंभ दिनानिमित्त बारामती प्रशासकीय भवनातील उप माहिती कार्यालयात ‘पत्रकार दिन’ साजरा करण्यात आला. प्रारंभी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी श्री. कांबळे यांनी उपस्थित सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास माहिती सहायक रोहिदास गावडे यांच्यासह पत्रकार रामचंद्र तावरे, सुधीर जन्नू, राजू कांबळे, संतोष जाधव, मन्सूर शेख, दशरथ मांढरे, कल्याणी वाघमोडे व उपमाहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment