माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेना क्रांती शौर्य सेनेच्या कल्याणी वाघमोडे यांच्याकडून अनेक मागण्यांचे निवेदन सुपूर्द - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, January 5, 2023

माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेना क्रांती शौर्य सेनेच्या कल्याणी वाघमोडे यांच्याकडून अनेक मागण्यांचे निवेदन सुपूर्द

माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेना  क्रांती शौर्य सेनेच्या कल्याणी वाघमोडे यांच्याकडून  अनेक मागण्यांचे  निवेदन सुपूर्द 

बारामती प्रतिनिधी: - आज बारामती या  ठिकाणी आयोजित संपादक पत्रकार सन्मान सोहळा तसेच  ओबीसी मेळावा मधे महाराष्ट्र राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष व काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले उपस्थित होते .यावेळी  क्रांती शौर्य सेनेच्या कल्याणी वाघमोडे यांनी अनेक प्रलंबित सामाजिक मुद्द्याचे निवेदन सादर केले .यावर आपण विधानसभा मधे मुद्दे उपस्थित करून दखल घेऊ ,असा शब्द यावेळी त्यांनी दिला .

यामध्ये प्रामुख्याने खालीलप्रमाणे प्रमुख मागण्या होत्या .
1- शासकीय पत्रकार यांना सुविधा मिळाव्यात.
2- स्थानिक स्वराज्य संस्था मधे ओबीसी समाजाला  राजकीय आरक्षण कायम राहावे .
3- अधिकारी / कर्मचारी यांना पदोन्नती मध्ये आरक्षण लागू करावे .
4- ओबीसींची जातनिहाय जनगणना करणेत यावी .
5- ओबीसी विद्यार्थ्यांना महाज्योती च्या माध्यमातून फेलोशिप , शिष्यवृत्ती मिळावी जेणेकरून ओबीसी विद्यार्थी पूर्ण शिक्षण घेण्यापासून वंचित राहणार नाही . 
6- तसेच धनगर जमातीला अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करावे .
अश्या अनेक मागण्यांचे निवेदन क्रांती शौर्य सेनेच्या वतीने अध्यक्ष कल्याणी वाघमोडे यांनी यावेळी दिले .

No comments:

Post a Comment