बापरे..स्वत:च्या खुनाचा बनाव रचणाऱ्या आरोपीला जन्मठेप;हुबेबुब दिसणाऱ्या व्यक्तीचा केला खून..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, January 20, 2023

बापरे..स्वत:च्या खुनाचा बनाव रचणाऱ्या आरोपीला जन्मठेप;हुबेबुब दिसणाऱ्या व्यक्तीचा केला खून..!

बापरे..स्वत:च्या खुनाचा बनाव रचणाऱ्या
आरोपीला जन्मठेप;हुबेबुब दिसणाऱ्या व्यक्तीचा केला खून..!
 पुणे :- कर्जाचा डोंगर असल्याने भलतीच शक्कल लढवीत केला भयंकर प्रताप याबाबत मिळालेली माहिती अशी की,कर्जबाजारी झाल्याने हुबेहुब दिसणाऱ्या व्यक्तीचा खून करुन स्वत:च्या खूनाचा बनाव रचणाऱ्या आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि सव्वातीन लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. विठ्ठल तुकाराम चव्हाण (वय-45 रा. बारामती) असे शिक्षा झालेल्या
आरोपीचे नाव आहे. तर या प्रकरणात एकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. कर्जबाजारी झालेल्या विठ्ठल चव्हाण आणि त्याच्या साथिदाराने चव्हाण याच्या सारख्या दिसणाऱ्या
विनायक उर्प पिंटू ताराचंद तळेकर (वय-32 रा. कोडीत खुर्द, ता. पुरंदर) याला दारु पाजली. त्यानंतर त्याला कात्रज घाट, कोंढणपूरमार्गे खेड शिवापूर परिसरातील मरिआई घाटात नेले. मोटारीत तळेकरला मारहाण केली. तसेच त्याच्या अंगावर मोटारीतील पेट्रोल टाकून पेटवून दिले. या गुन्ह्याचा तपास सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. आर. गौड यांनी केला. आरोपी चव्हाण आणि साथीदाराला अटक
करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.या खटल्यात सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी वकील अॅड. चंद्रकिरण साळवी यांनी
बाजू मांडली. न्यायालयाने साक्ष, पुरावे ग्राह्य धरून आरोपी चव्हाण याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.न्यायालयीन कामकाजात सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील,पोलीस उपनिरीक्षक विद्याधर निचित ,संदीप चांदगुडे, शशिकांत वाघमारे यांनी मदत केली.

No comments:

Post a Comment