*मनाला स्थिर करण्यासाठी सदगुरूची आवश्यकता आहे...! - मोहन छाब्राजी* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, January 8, 2023

*मनाला स्थिर करण्यासाठी सदगुरूची आवश्यकता आहे...! - मोहन छाब्राजी*

*मनाला स्थिर करण्यासाठी सदगुरूची आवश्यकता आहे...! - मोहन छाब्राजी*
    
बारामती: - या जगात मानवी मनाची समजूत काढण्यासाठी खूप गुरू भेटतील पण माणसाचं मन स्थिर करण्यासाठी सदगुरूची नितांत आवश्यकता आहे असे उद्गगार संत निरंकारी मंडळाचे मेंबर इंचार्ज श्री. मोहन छाब्राजी (दिल्ली) यांनी काढले.
     निरंकारी सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आदेशानुसार या महिन्यात २७ ते ३० च्या दरम्यान महाराष्ट्राच्या 56 व्या संत समागमाची रूपरेषा आखण्यासाठी श्री. छाब्रा औरंगाबादला आले होते. त्याप्रसंगी सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे यांच्या आग्रहास्तव बारामतीला आल्याने त्यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील सत्संग भवनात विशाल सत्संग सोहळा आयोजित केला होता. त्याप्रसंगी त्यांनी वरील उद्गगार काढले.
     या सत्संग सोहळ्या बारामती नगर परिषदेच्या मा. नगरसेविका सिमाताई योगेश चिंचकर यांच्यासह सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे, सातारा क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक दिपक शेलार, बारामती क्षेत्राचे क्षेत्रिय संचालक किशोर माने तसेच ज्ञान प्रचारक महादेव शिंदे, ज्ञान प्रचारक नवनाथ शेलार तसेच बारामतीसह इंदापूर सातारा जिल्ह्यातून मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
      जमलेल्या उपस्थितांना नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा देऊन श्री. छाब्रा म्हणाले माणूस कोणत्या ना कोणत्या देवाची भक्ती करत आहे परंतू भक्ती करत असताना त्यामध्ये कोणतीही अपेक्षा नसावी ती निस्वार्थ असायला हवी व त्यामध्ये शुद्ध भाव असावा, प्रेम नम्रता, सहनशीलतेने भरलेला देहच परिपूर्ण माणूस असल्याची खरी ओळख आहे असेही प्रवचनाच्या शेवटी सांगितले.
    उपस्थितांचे आभार श्री. झांबरे यांनी मानले तर सूत्रसंचालन निलेश काटकर यांनी केले.

No comments:

Post a Comment