धक्कादायक..देवस्थानच्या मालकीची चारशे एकर जमीनच विकली.! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, January 6, 2023

धक्कादायक..देवस्थानच्या मालकीची चारशे एकर जमीनच विकली.!

धक्कादायक..देवस्थानच्या मालकीची चारशे एकर जमीनच विकली.!                                                                                               कोल्हापूर:- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्रीक्षेत्र ज्योतिबा देवस्थानच्या मालकीची चारशे एकर जमीनी परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय.या प्रकरणाची चौकशी देवस्थान समितीने सुरू केलीय,मात्र तत्कालीन सरकारच्या मंत्र्यांच्या पुढाकारानेच हे
सगळे प्रकार घडले असून याची चौकशी करण्याची मागणी भाजपचे नेते आणि देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांनी केलीय. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र जोतिबाची जमीन परस्पर विक्री केलाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने जमिनीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता हा सगळा प्रकार पुढे आलाय. देवस्थान समिती कडे असलेल्या जोतिबाच्या मानाच्या सासनकाठ्या नोंदणीच्या वेळी, कसायला दिलेल्या जमिनीची कागदपत्र दाखवण्याची अट घातल्याने हा प्रकार उघडा पडला.श्रीक्षेत्र जोतिबा देवस्थान कडे हजारो एकर जमीन आहे. यातील 50 एकर 100 एकर 200 एकर असे हिस्से महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील मानकरांकडे आहेत. वर्षानुवर्ष देवस्थानची जमीन देवाच्या नावाने कसणाऱ्या अनेक लोकांनी देवस्थानचं नाव काढून पहिलं नाव स्वतःच लावल्याची धक्कादायक माहिती देवस्थानला मिळत आहे. जी पहिली पिढी देवस्थानच्या नावाने जमिनी कसत होत्या, त्या पिढीने आपल्या दुसऱ्या पिढीच्या नावावरच त्या जमिनी केल्याची शंका देवस्थान समितीला आली आहे. या प्रकरणाला तत्कालीन सरकार कारणीभूत असल्याचा आरोप भाजपचे नेते आणि देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष
महेश जाधव यांनी केलाय. एकूणच देवाच्या दारातच हा देवाच्या जमिनी हडपण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे आता कारवाई कोणावर करणार आणि कोण करणार हा प्रश्न आहे. मात्र या जमिनी पुन्हा देवस्थान समितीला मिळणार का अशी चर्चा होताना दिसत आहे.

No comments:

Post a Comment