बा.न.पा.हद्दीतील जामदार रोडच्या खड्डेयुक्त रस्त्यांचे डांबरीकरण कधी होणार व जनतेला चांगले रस्ते कधी मिळणार? - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, January 6, 2023

बा.न.पा.हद्दीतील जामदार रोडच्या खड्डेयुक्त रस्त्यांचे डांबरीकरण कधी होणार व जनतेला चांगले रस्ते कधी मिळणार?

बा.न.पा.हद्दीतील जामदार रोडच्या खड्डेयुक्त रस्त्यांचे डांबरीकरण कधी होणार व जनतेला चांगले रस्ते कधी मिळणार?

बारामती:- बारामती विकसित होत असताना काही भागात जाणून बुजून दुर्लक्ष होत असलेल्या प्रभागात अपुऱ्या मूलभूत सुविधा मिळत  असल्याचे अनेक उदाहरणे पुढे येत आहे, अश्यातच काही वर्षांपूर्वी बारामती नगरपरिषदे समोर अनेक दिवसांचे जामदार रोड च्या रस्त्यासाठी आंदोलन चांगलेच गाजले होते आज पुन्हा एकदा या रस्त्याची चर्चा चांगलीच रंगली आहे,'बा.न.पा.ला कोणी डांबर देतं का डांबर'अशी म्हणण्याची वेळ येथील स्थानिक रहिवासी यांची झालीय, याबाबत समजलेली माहिती अशी आहे की,वैष्णवी ग्राफिक्स समोरून जामदार रोडला जाणारा रस्ता  सन 2022 या अखंड वर्षभरात जागोजागी मोठ मोठे खड्डे पडुन खराब झाला आहे, त्यामुळें अनेक वेळा अपघात झाले आहेत तरी या खड्डयांबद्दल बा.न.पा. मुख्यधिकारी यांना नागरिकांनी वारंवार कळवून देखील खड्डयांची दुरुस्ती व डांबरीकरण केले जात नाही, केव्हा पर्यंत फक्त या रोड वरील नागरिकांन कडून नगरपालिकेचा महसुल गोळा करून midc रोड चांगला करणार अशी चर्चा रंगू लागली आहे, इकडं काय माणसे राहत नाहीत का?अशी येथील नागरिकांनी आपली खंत व्यक्त केली,तरी येणार्या 2023 ला ईश्वरा कडे जामदार रोड वासीयांची प्राथर्ना आहे येणार्या वर्षात तरी बा.न.पा. मुख्यधिकारीयांनी एमआयडीसी (भिगवण) रोड वर लक्ष कमी करून बारामतीच्या दुर्लक्षित जामदाररोड कडे लक्ष देऊन या  रस्त्याचे काम करून नागरिकांना सहकार्य करावे अशी विनंती जामदार रोड येथील रहिवासी करीत आहे.

No comments:

Post a Comment