सर्वात मोठी कारवाई;अवैध मुरूम उपसा प्रकरणी महामार्गाच्या ठेकेदारास 4 कोटी 11लाख 6840/- दंड.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, February 16, 2023

सर्वात मोठी कारवाई;अवैध मुरूम उपसा प्रकरणी महामार्गाच्या ठेकेदारास 4 कोटी 11लाख 6840/- दंड..

सर्वात मोठी कारवाई;अवैध मुरूम उपसा प्रकरणी महामार्गाच्या ठेकेदारास 4 कोटी 11लाख 6840/- दंड..

बारामती:- बारामती तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पालखी महामार्गाच्या नावाखाली अवैध मुरूमाचे उत्तखनन होत असल्याने माहिती अधिकार महासंघाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष मंगलदास निकाळजे यांनी तक्रारी केल्या होत्या त्या तक्रारीचा पाठपुरावा करुन तब्बल 10 हजार ब्रास पेक्षा जास्त अवैध मुरूम उत्तखननाचे संबंधित तलाट्या मार्फत पंचनामे करुन घेतले होते. या संबंधात वारंवार पाठपुरावा केल्यानंतर तहसीलदार यांनी संबंधिताना नोटीसा काढून परवानगी बाबत कागद पत्रे सादर करण्यास सांगितल्या नंतर संबंधित ठेकेदार यांनी परवानग्या न घेताच उत्तखनन केल्याचे समोर आले. त्यानंतर तहसीलदार यांनी शेळके कन्ट्रक्शन  प्रायव्हेट लि यांना तब्बल 4 कोटी 11 लाख 6840 रुपये एव्हढा दंड करुन सात दिवसात भरण्याचे आदेश केले आहेत.
हे उत्तखनन महामार्गाच्या नावाखाली दिवसा ढवळ्या चालू होते संबंधित अधिकाऱ्यांना माहिती असताना हे का चालू होते याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अवैध उत्तखानन न होऊ देणे हे संबंधित तलाठी, सर्कल, तहसीलदार व इतर कर्मचाऱ्यांची कामे असताना मंगलदास निकाळजे यांच्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना समोर येऊन तक्रारी कराव्या लागतात मग कार्यवाही करण्यात येते ही खूप मोठी शोकांतिका आहे
सदरचा दंड झाल्यानंतर मंगलदास निकाळजे यांनी सांगितले कि वारंवार तक्रारी अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून त्याचा सातत्याने पाठपुरावा करावा लागतो त्यावेळी अशा प्रकारच्या कार्यवाही होतात परंतु स्वतः होऊन अधिकारी अशा कार्यवाही करत नाहीत त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर देखील कार्यवाहीची मागणी करणार आहे तसेच अशा प्रकारचे अवैध उत्तखनन करणाऱ्यावर कार्यवाही करण्यास भाग पडून जास्तीत जास्त निधी शासनास मिळवून देणार आहे व अशा ठेकेदारांना यादीतून काढून टाकून काळ्या यादीत टाकण्याची मागणी करणार असल्याचे मंगलदास निकाळजे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment