नारायण शिरगावकर(ACP) यांना गुन्ह्याच्या उत्कृष्ट तपासाबद्दल केंद्रीय गृहमंत्रालयाकडून DG रजनीश सेठ यांच्या हस्ते पदक देऊन सन्मान.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 15, 2023

नारायण शिरगावकर(ACP) यांना गुन्ह्याच्या उत्कृष्ट तपासाबद्दल केंद्रीय गृहमंत्रालयाकडून DG रजनीश सेठ यांच्या हस्ते पदक देऊन सन्मान..

नारायण शिरगावकर(ACP) यांना गुन्ह्याच्या उत्कृष्ट तपासाबद्दल केंद्रीय गृहमंत्रालयाकडून DG रजनीश सेठ यांच्या हस्ते पदक देऊन सन्मान..
पुणे :- बारामतीला उपविभागीय अधिकारी म्हणून काम पाहिलं व आज Acp काम करीत असलेले नारायण शिरगावकर यांचा सन्मान करण्यात त्याबाबत मिळालेली माहिती अशी की,पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या नराधम आरोपीस परभणीच्या गंगाखेड जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास
केल्याबद्दल गुन्ह्याचे तपास अधिकारी आणि पुणे
पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त गुन्हे - 2 नारायण शिरगावकर  यांचा केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्या हस्ते पदक देऊन सन्मान करण्यात आला. ही घटना परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील शेळगाव गावात घडली होती. या गुन्ह्याचा तपास नारायण शिरगावकर
यांनी केला होता.परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील शेळगाव गावातील ५ वर्षांच्या निर्भयावर अतिशय क्रूरपणे नराधमाने बलात्कार करून तिचा खून करून विहिरीत टाकून दिले होते. नुकतीच घडलेली कोपर्डी घटना व या
घटनेची सवेंदनशीलता, जनतेचा आक्रोश यामुळे या गुन्ह्याचा तपास गंगाखेड या ठिकाणी कर्तव्य बजावत असलेले नारायण शिरगावकर यांच्याकडे देण्यात आला. या गुन्ह्यात एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना भौतिक पुराव्यांच्या आधारे तपासाची साखळी जोडून शिरगावकर यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. तीन वर्षांच्या कालावधीमध्ये न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आणि पीडितेला न्याय मिळाला.केंद्रीय गृहमंत्रालयाने या गुन्ह्याच्या उत्कृष्ट तपासाबद्दल बुधवारी (दि.15) नारायण शिरगावकर यांचा पोलिस महासचालक यांच्या हस्ते पदक देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी नारायण शिरगावकर यांनी पदक प्रदान करुन माझ्यावर विश्वास दाखवला, त्यातून आज पर्यंत पोलीस दलात केलेल्या कामाबद्दलचे समाधान मिळाले.हे यश वरिष्ठांचे मार्गदर्शन व टीमच्या सहकाऱ्याशिवाय शक्य नव्हते,त्यामुळे त्यांचा आभारी असल्याचे नारायण शिरगावकर
यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment