धक्कादायक.. रुग्णालयात नोकरीला लावण्याच खोटं आश्वासन देऊन नर्सचा डॉक्टरवर बलात्कार.! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, March 3, 2023

धक्कादायक.. रुग्णालयात नोकरीला लावण्याच खोटं आश्वासन देऊन नर्सचा डॉक्टरवर बलात्कार.!

धक्कादायक.. रुग्णालयात नोकरीला लावण्याच खोटं आश्वासन देऊन नर्सचा डॉक्टरवर बलात्कार.!
कोझीकोडे :- कोणत्याही आश्वासनाला बळी पडत असलेले पीडित महिला व त्यांचेवर झालेले अत्याचार याची संख्या वाढताना दिसत आहे, याबाबत अनेक ठिकाणी महिला, मुली सुरक्षित नसल्याचे पुढे आले आहे तर एका व्हायरल झालेल्या बातमीत धक्कादायक माहिती पुढे आली याबाबत प्रसिद्ध झालेली माहिती अशी की, महिला डॉक्टरवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी 24 वर्षीय पुरुष नर्सला अटक केली. आरोपीने महिला डॉक्टरचे न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर केले.हा गुन्हा मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात घडला. दोघे
कर्नाटकातील हॉस्पिटलमध्ये नोकरीला होते.
पोलिसांनी ही माहिती दिली. कोइम्बतोर येथील
रुग्णालयात नोकरीला लावण्याच खोटं आश्वासन देऊन आरोपी नीशाम बाबूने पीडित तरुणीवर अत्याचार केला. डॉक्टर तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार करुन तिचे न्यूड फोटो काढले.त्यानंतर आरोपी नर्सने न्यूड फोटो ऑनलाइन शेअर
करण्याची धमकी देऊन महिला डॉक्टरवर वारंवार अत्याचार केला. आरोपीच्या मागणीला कंटाळून पीडित तरुणीने पुरुष नर्सचा नंबर मोबाइलवर ब्लॉक केला. त्यानंतर आरोपीने पीडित तरुणीचे न्यूड फोटो शेअर केले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. नीशाम
बाबूवर पोलिसांनी आयपीसीच्या सेक्शन 376
(बलात्कार), 67 A माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

No comments:

Post a Comment