खळबळजनक..गोबरगॅसच्या टाकीत पडून चौघांचा दुर्देवी मृत्यू, पिता-पुत्राचा समावेश - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 15, 2023

खळबळजनक..गोबरगॅसच्या टाकीत पडून चौघांचा दुर्देवी मृत्यू, पिता-पुत्राचा समावेश

खळबळजनक..गोबरगॅसच्या टाकीत पडून चौघांचा दुर्देवी मृत्यू, पिता-पुत्राचा समावेश
बारामती:- बारामती तालुक्यातील खांडजमध्ये गोबरगॅसच्या टाकीत पडून चौघांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना आज (दि. 15) घडली आहे. दरम्यान, या घटनेत आणखी एकजण
अत्यवस्थ असून त्यास उपचारासाठी बारामतीमधील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये पिता-पुत्राचा आणि चुलत्याचा समावेश आहे. प्रकाश सोपान आटोळे, प्रविण भानुदास आटोळे,भानुदास आनंदराव आटोळे व बापुराव लहुजी गव्हाणे असे मृत्यमुखी पडलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, खांडज गावच्या हद्दीतील 22 फाटयाजवळील आटोळेवस्ती येथे ही घटना आज (दि.15) सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. प्राथमिक माहिती गोबरगॅसच्या टाकीमध्ये पडल्याने चौघांचा मृत्यू झाला आहे तर एक जण अत्यवस्थ आहे. चौघांना तात्काळ बारामतीमधील सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले आहे.
अत्यवस्थ असणाऱ्या एकाला पुढील उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.रूग्णालयाच्या परिसरात नागरिकांनी आणि मृतांच्या नातेवाईकांची गर्दी झाली आहे.पोलिस देखील घटनास्थी दाखल झाले आहेत.

No comments:

Post a Comment