रॉयल पब्लिक स्कूल मध्ये महिला दिन उत्साहात .... विद्यार्थ्यांनी केले मातृ पूजन - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, March 9, 2023

रॉयल पब्लिक स्कूल मध्ये महिला दिन उत्साहात .... विद्यार्थ्यांनी केले मातृ पूजन

रॉयल पब्लिक स्कूल मध्ये महिला दिन उत्साहात .... विद्यार्थ्यांनी केले मातृ पूजन

सोमेश्वरनगर  -  प्रतिनिधी
कोऱ्हाळे बुद्रुक येथील मोरया प्रतिष्ठानच्या रॉयल पब्लिक स्कूल मध्ये महिला दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी मातृ पूजन केले.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ चैत्राली खलाटे होत्या. तर माळवाडीच्या पोलिस पाटील संध्या पिंगळे, रुक्मिणी महिला बचत गटाच्या अध्यक्षा सोनाली जगताप, अनुराधा जगताप, प्रियांका जगताप उपस्थित होत्या.
    डॉ. चैत्राली खलाटे यांनी मुले व त्यांचे आरोग्य या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी महिला पालकांसाठी विविध मनोरंजनात्मक स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यामध्ये महिला पालकांनी उत्साहात सहभाग घेतला.
स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे 
लिंबू चमचा - सारिका खोमणे, जया गडकरी
सुई दोरा - ज्योती गाढवे, स्नेहल खलाटे
विटेवर चालणे - अनिता खोमणे, स्नेहल खलाटे
तळ्यात मळ्यात - अनिता खोमणे, ज्योती गाढवे
टिकली लावणे - प्रिया धुमाळ
उखाणे - वर्षा पवार, शीतल खोमणे
संगीत खुर्ची - वर्षा पवार, अंजली मतकर
 सर्व स्पर्धेत वर्षा पवार, स्नेहल खलाटे, अनिता गाढवे यांनी चांगली कामगिरी केल्याने त्यांना सन्मानित करण्यात आले.
   मान्यवरांचे स्वागत संस्थेच्या अध्यक्षा अनिता गावडे यांनी केले.  कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या प्राचार्य एस व्हि सावळकर, मनीषा जाधव, निकिता खलाटे, प्राजक्ता पानसरे,धनश्री जगताप यांनी केले.

No comments:

Post a Comment