पोलीस स्टेशनमध्येच ब्लेडने गळ्यावर वार,एकजण गंभीर जखमी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 14, 2023

पोलीस स्टेशनमध्येच ब्लेडने गळ्यावर वार,एकजण गंभीर जखमी..

पोलीस स्टेशनमध्येच ब्लेडने गळ्यावर वार,एकजण गंभीर जखमी..                                                                                       नारायणगाव :- दोन तक्रारदारांमध्ये वाद होऊन एका तक्रारदाराने दुसऱ्या तक्रारदाराच्या गळ्यावर ब्लेडने वार करून गंभीर जखमी केले.याबाबत माहिती अशी की,खेड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या क्षितिज बाबाजी दांडगे (रा. दोंदे, ता. खेड) असे
जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोंदे (ता. खेड) येथे
दोन कुटुंबामध्ये वाद होऊन सोमवारी मारामारी झाली होती. पत्नीला मारहाण झाल्यामुळे वैभव गोविंद बो-हाडे तक्रार देण्यासाठी खेड पोलीस ठाण्यात आले होते. याचवेळी क्षितिज बाबाजी दांडगे हादेखील तक्रार देण्यासाठी आला होता. पोलिसांनी दोघा तक्रारदारांना एकत्र बसवून ठेवले होते. या दोघांमध्ये पुन्हा पोलीस
ठाण्यात बाचाबाची झाली. पत्नीला मारहाण केल्याचा राग अनावर होऊन वैभव बोऱ्हाडे याने खिशातील ब्लेड काढून दांडगे यांच्या गळ्यावर वार केला. या हल्ल्यात दांडगे गंभीर जखमी झाला. पोलिसांनी तत्काळ जखमीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल
केले.

No comments:

Post a Comment